अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार मलिक
चाळीसगांव(प्रतिनिधी दि 6)- आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दिनांक 6 जानेवारी 1832 रोजी मराठी भाषेतील पहिले मराठी वृत्तपत्र दर्पण सुरू केले याच कारणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात 6 जानेवारी हा दिवस मराठी पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो,त्याचाच एक भाग म्हणून आमदार मंगेश चव्हाण व शिवनेरी फाउंडेशन च्या अध्यक्षा व आमदार यांच्या सौभाग्यवती प्रतिभा ताई चव्हाण यांनी पत्रकारांच सपत्नीक गौरव समारंभाचे आयोजन आमदार संपर्क कार्यालय करगाव रोड चाळीसगांव येथे केले होते
कार्यक्रमाची सुरुवात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली, पूढे चालत जश्या मागे पावलांच्या खुणा पडतात तसेच आपल्या कार्यात पुढे जातांना आपल्या कर्तृत्ववान कार्याच्या खुणा मागे सोडत आमदार चव्हाण पुढे चालत आहे,आमदार झाल्या पासून नेहमी तालुक्यातील समस्या जणू आपल्या घरातील समस्या आहे असे समजून पुढाकार घेत शेतकऱ्यांसाठी पावसात आंदोलन असो की पूरग्रस्तांना स्वखर्चाने मदत असो की नुकतेच आशा वर्करांना मुलींच्या लग्नांसाठी 25 हजार रुपयांची मदत जाहीर करणे नेहमी अश्या आपल्या विशिष्ट कर्यांनी तालुक्यात चर्चेत राहणारे आमदार चव्हाण यांनी पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सपत्नीक सन्मान करत पत्रकारांच्या कार्यात पत्रकारांच्या सौभाग्यवतींचे खूप मोठे योगदान असून पत्रकारांच्या सन्मानाची वेळ असली तर त्यांना विसरून कसे चालणार म्हणत जेष्ठ ते तरुण पत्रकारांचा सपत्नीक सन्मान केला यावेळी बोलतांना पत्रकारांच्या व्यथा कथा मांडत पत्रकारांना जाहिरातींसाठी होणारा त्रास कार्य करतांना येणाऱ्या अडचणी अश्या विविध विषयांवर चर्चा केली तसेच आपण आपले कार्य निपक्षपणे करत राहावे पत्रकार लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ आहे ,मी जरी चुकलो तर माझ्या विरोधात बातमी लावावी जेणे करून मला माझी जर चूक झाली असेल तर मला कळेल व पत्रकारांनी राजकारण्यांचे मित्र न बनता आपले कार्य चोखपणे करावे शोषितांच्या व वंचितांच्या प्रश्नांना वाचा फोडावी.
यावेळी तालुक्यातील ज्येष्ठ ते तरुण पत्रकार उपस्थित होते कार्यक्रमास राजकीय रंग न देता फक्त संवाद साधत कार्यक्रम घरघुती वातावरणात उपस्थित सर्व पत्रकार बंधूंचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.