मराठी भाषेचे संवर्धन व जतन करण्याच्या अनुषंगाने राज्य परिवहन चाळीसगाव आगारात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात संपन्न

0 0
Read Time3 Minute, 41 Second


अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

उपसंपादक रोहित शिंदे

चाळीसगांव(प्रतिनिधी)-कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. अभिजात मराठी भाषेचे संवर्धन व जतन करण्याच्या अनुषंगाने राज्य परिवहन चाळीसगाव आगारात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात संपन्न करण्यात आला.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून साहित्यिक मनोहर आंधळे तसेच दै.दिव्य मराठीचे प्रतिनिधी अजय कोतकर हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आगाराचे आगार व्यवस्थापक संदीप निकम यांनी भूषविले.
प्रमुख अतिथींच्या हस्ते कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. प्रातिनिधिक स्वरूपात प्रवाशांना पुष्प देऊन तसेच साखर पेढे वाटून मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
प्रमुख अतिथी श्री आंधळे यांनी मराठी भाषेचा इतिहास सांगून अभिजात मराठी भाषेच्या अनेक बोलीभाषा असल्याचे तसेच मराठी भाषेचे जतन व संवर्धन करण्याची जबाबदारी प्रत्येक मराठी भाषिकांची असल्याचे तसेच जगात टिकण्यासाठी अन्य भाषा जरी महत्त्वाच्या असल्या तरी आपल्या मातृभूमीत पाय घट्ट रोवून उभे राहण्यासाठी मराठी भाषेला पर्याय नसल्याचे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष संदीप निकम यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सर्व कर्मचारी तसेच प्रवाशांना मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा देऊन मराठी भाषेचा संस्कार प्रत्येक मराठी माणसाच्या घरात रुजवण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाने कटिबद्ध असण्याची गरज प्रतिपादीतन करून मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी प्रत्येकाने मराठी भाषेचा वापर करण्याचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक वाहतूक अधीक्षक किशोर मगरे, कार्यशाळा अधीक्षक मनोज भोई,पाळी प्रमुख आनंदा साळुंखे, वाहतूक नियंत्रक किरण काकडे, भाऊसाहेब हडपे, दीपक जाधव, संजय जाधव, तुषार महाजन, अनिल जाधव, आशा निकम,संगिता देवकर,दिपाली पाटील,सुधीर जाधव, शैलेश राठोड, किरण पाटील,सरोज पाटील, चेतन वाघ, आबा चौधरी, पी.जी.माळी,मुकुंदा सोनवणे,निलेश निकुंभ,दीपक चौधरी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शांताराम पाटील यांनी तर आभार किशोर मगरे यांनी व्यक्त केले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.