संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
जळगांव(प्रतिनिधी)- ग्रामपंचायत कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आवाज उठवण्यासाठी, महाराष्ट्र ग्रामपंचायत कामगार सेना युनियन 1 जुलै 2024 रोजी मुंबई आझाद मैदान ते विधान भवनपर्यंत मोर्चा काढणार आहे. हा मोर्चा सकाळी 11 वाजता सुरू होईल आणि विविध प्रलंबित मागण्यांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आयोजित केला जात आहे.
जिल्हा अध्यक्ष विजय रल आणि जिल्हा सचिव राहुल महाले यांनी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
मोर्चाच्या मुख्य मागण्या नगरपालिका आणि जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांप्रमाणेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन द्यावे,किमान वेतनाचा 19 महिन्यांचा थकीत रक्कम द्यावी,ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर लादण्यात आलेली वसुलीची अट रद्द करावी याव्यतिरिक्त, कर्मचारी निवृत्ती वेतन, सामाजिक सुरक्षा आणि इतर सेवांमध्ये सुधारणा यासह इतर अनेक मागण्या देखील करत आहेत.
जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना या मोर्चामध्ये सहभागी व्हावे आणि आपल्या मागण्यांसाठी आवाज उठवावा.
या मोर्चासंबंधी अधिक माहितीसाठी, कृपया महाराष्ट्र ग्रामपंचायत कामगार सेना युनियनशी संपर्क साधावा व जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन जळगांव जिल्हा अध्यक्षांनी केले आहे.