अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार मलिक
चाळीसगांव(प्रतिनिधी)-महाराष्ट्र प्रदेश सर्वोदय मंडळाच्या लोकसेवकांचे संमेलन दि.18 जून व 19 जून रोजी दोन दिवसीय निवासी शिबीर चाळीसगांव येथील हिरापुर रोड वरील साने गुरूजी कथामाला सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी दि.29 मे रोजी चाळीसगांव येथील विविध क्षेत्रातील कार्यकर्ते व पदाधिकार्यांची बैठक केमिस्ट भवन येथील सृष्टी फांऊडेशनच्या सभागृहात घेण्यात आली. दिलीप दामेादर चव्हाण यांची संमेलनाचे निमंत्रक म्हणून एकमताने निवड बैठकीत करण्यात आली.कल्पतेश देशमुख यांची सचिव तर सहसचिव म्हणून सागर नागणे यांची निवड करण्यात आली.संमलेनाच्या यशस्वीतेसाठी डॉ.स्वप्निल शिंदे ,विजय शर्मा ,योगेश पाटील,सचिन पाखले, मंगेश चिंचोले,मंदाताई कांबळे,गफ्फार शेख,जावेद शेख, पवन राठोड,गणेश भोई ,निलेश परदेशी हे सहकार्य करत आहे. प्रदेश सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष रमेश दाणे यांनी सर्वोदयाची स्थापना,उद्दीष्टे, व कार्यपध्दती विषयी माहिती देत आजच्या काळात संमेलनाची आवश्यकतेचे मह्त्तव विषद केले.चाळीसगांव मधील लोकचळवळी,स्वातंत्र्याचे आंदोलन व ऐतिहासिक पार्श्वभूमी, सांगितली. ज्येष्ठ सर्वोदयी डॉ.सुगन बरंठ,प्रदीप खेलुरकर,संजय जोशी आदींनी आपले विचार मांडले. चाळीसगांव येथे अनेक वर्षांपासून वैचारिक कार्यक्रमाचे आयोजन झालेले नाही.या पार्श्वभूमीवर तसेच आजच्या जातीवादाच्या स्फोटक राजकीय परिस्थिती तसेच धर्मांधतेच्या पार्श्वभूमीवर गांधीजींचा ,साने गुरूजींचा व विनोबा भावेंचा विचार उजागर करण्याची आवश्यकता असल्याचे निमंत्रक दिलीप चव्हाण यांनी यावेळी नमूद केले.यावेळी विजय कुमावत, योगेश पाटील, विनोद पगार, डॉ.स्वप्निल शिंदे ,जनार्दन पाटील, मधुकर शिरसाठ, आदीसह उपस्थित होते.