महिला दिनी मान्यवर महिलांची वेशभूषा साकारत अस्सलाम इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनींनी करून दिली त्यांच्या कार्याची ओळख

1 0
Read Time3 Minute, 59 Second


अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगांव(प्रतिनिधी)- अस्सलाम इंग्लिश स्कूल चाळीसगाव शाळेत आठ मार्च जागतिक महिला दिवस विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी विविध भूमिका साकार करत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रिन्सिपल इम्रान सर हे होते, आयोजक म्हणून संस्थेचे मोहिनुद्दीन शेख,अफरोज खान,सलाउद्दीन शेख,जमीर उद्दीन शेख. मजर खान. तर प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार तन्वीर शेख, सामाजिक कार्यकर्ते इम्रान पैलवान,एम आय एम चे तालुकाध्यक्ष मुक्तार कुरेशी, सामाजिक कार्यकर्ते बाबा ठेकेदार,पत्रकार इरफान मिर्झा आदी उपस्थित होते,
कार्यक्रमाची सुरुवात कुराण पठण करून करण्यात आली. त्यानंतर सर्व उपस्थित पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत, मोहिउद्दिन शेख, सलाउद्दीन शेख ,अफरोज खान ,तन्वीर शेख, मुक्तार कुरेशी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना अस्सलाम शाळेच्या होत असलेल्या प्रगती भरभराटी बद्दल कौतुक केले कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने घेतल्याबद्दल शाळेच्या सर्व शिक्षक शिक्षिका यांचे अभिनंदन केले.
शाळेची विद्यार्थिनी अलिजा मजर ने सुरह फातेहा पठण केले, खाटीक कुलसुम अतिक ने सुरह फातेहा चे हिंदी मध्ये अनुवाद केले, अमर मुदस्सीर ने सुरत आलम नसरा चे पठण केले, न्यूजत महमूद खान सावित्रीबाई फुले ,एशल वसीम शेख ने सरोजनी नायडू,आलीना तन्वीर शेख हिने मदर टेरेसा,अलिजा मजर इंद्रागांधी,रिजा रिजवान शेख कमला नेहरू,सय्यद फ़ाईजा इमरान राणी लक्ष्मीबाई,शेख कारया अखलाक सकीनातुल फातेमा, सय्यद नम्रह वकार बेगम हजरत महल, अश्या विविध मान्यवर महिलांच्या वेशभूषा साकारत त्यांच्या कार्याची जाणीव उपस्थितांना करून दिली.

इशाल,आलिया,आईशा,कुलसुम,यांनी कविता म्हटल्या तर निदा नाज इरफान शेख,जाहिद वसीम,आयान इमरान,खिझर हबीब शेख,अतिफ मुदस्सीर, अनस अयुब,हसन समीर शे,आमना महमूद शेख,आशिया समीर, अनस शाकीन ,जियान कयूम खान,फातेमा मुक्तार,साद शेख शोएब,जोया शेख रजान,रिजवान रईस,हसिब सलाउद्दीन,इजान युनुस खान,इब्राहिम फिरोज कुरेशी, नुसरत असलम खान,समीर शेख शोएब,मुजककीर खान मुषर्रफ,गुलनाज कलीम बेग अश्या सर्व विद्यार्थ्यांनी विविध विषयावर आपले कला गुण दाखविले

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे प्रिन्सिपल इम्रान सर, अर्शिन शेख शकील,सना खान रशीद खान,कौसर शौकत मिर्जा, नेहा अरिफ मिर्झा, रशीद शेख शकील इत्यादी शिक्षिकांनी परिश्रम घेतले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.