अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी) –मालेगाव रोडवरील बायपास पुलाखाली रात्रीच्या वेळी अंधार आणि डिव्हायडरवर रिफ्लेक्टर नसल्याने होत असलेल्या अपघातांची बातमी अधिकार आमचा न्यूज नेटवर्कने प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासनाचे अखेर डोळे उघडले.संबंधित विभागाने तात्काळ हालचाल करत त्या ठिकाणी लाईट बसवले असून त्यामुळे अपघातांची शक्यता लक्षणीयरीत्या कमी होणार आहे.
काही दिवसांपूर्वी अधिकार आमचा न्यूज नेटवर्कचे उपसंपादक रोहित शिंदे यांनी जनहितार्थ सदर ठिकाणचा व्हिडिओ वृत्तांत प्रसारित करून अंधारामुळे आणि डिव्हायडरवर रिफ्लेक्टर नसल्याने चारचाकी वाहने धडकण्याचे प्रकार वाढत असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. या बातमीची दखल घेत संबंधित विभागाच्या वतीने तत्परतेने पाऊले उचलत पुलाखाली प्रकाश व्यवस्था करण्यात आली आहे.
यामुळे रात्रीच्या वाहतूक सुरक्षेत वाढ होणार असून भविष्यातील अपघातांना आळा बसण्यास मदत होणार आहे, अशी प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.
