माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी शासनातील भ्रष्टाचार बाहेर काढून समाजात जागल्या भूमिका निभवावी- सुभाष बसवेकर

1 0
Read Time2 Minute, 53 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

संपादक गफ्फार मलिक
ठाणे : माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी प्रशासनातील भ्रष्टाचार बाहेर काढून जागल्यांची भूमिका निभवावी तसेच जनतेचा करातून जमा झालेल्या निधीची उधळपट्टी चालली असून हा निधी शासन व प्रशासनाने काटेकोरपणे व काटकसरीने खर्च करावा म्हणून सरकारवर दबाब आणावा असे आवाहन माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे अध्यक्ष सुभाष बसवेकर यांनी केले.

घोडबंदर रोड ठाणे येथे २७ मार्च २०२२ रोजी आयोजित केलेल्या माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या कोकण विभाग कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
सुभाष बसवेकर पुढे बोलताना म्हणाले की माहिती अधिकार कायदा हा सामान्य माणसांच्या हिताचा कायदा आहे.हा कायदा निष्प्रभ करण्याचा शासन व नोकरशाहीचा डाव असून तो जनतेने हणून पाडला पाहिजे.तसेच या कायद्याचा जनसामन्यात जाऊन आपण प्रचार व प्रसार केला पाहिजे.कार्यकर्त्यांनी ज्ञान,
घेऊन प्रमाणिकपणा जपून व समाजिक कल्याणाचे भान ठेवून लोकहितासाठीच या कायद्याचा वापर केला पाहिजे. आजच्या काळात राजकारणाला महत्त्व आले असून समाजकारण मागे पडत चालले आहे.समाजाच्या गरीब व सामान्य माणसांच्या हिताचा प्राधान्यक्रम हरवला आहे.अशा वेळी माहिती अधिकार
कार्यकत्यांनी लोकांच्या हक्काचा आवाज बनले पाहिजे.असे प्रतिपादन सुभाष बसबेकर यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे पदाधिकारी रघूनाथ कडू, सुशील सिंग,बाळू साळवे,माया मगर,कामेश घाडी,सुनिल बूधा खूटाडे इत्यादी मान्यवर हजर होते.कार्यक्रमाचे संयोजन ठाणे जिल्हा माहिती अधिकार महासंघ पदाधिकारी श्री.दयानंद उल्मीक व शकील शेख यांनी केले होते.या कार्यक्रमासाठी कोकण विभागातून विशेषत: मुंबई,ठाणे,पालघर व रायगड जिल्हयामधून ११० कार्यकर्ते उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.