मुंबई(दि 20 मार्च):-मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या शहरांमधील जीवनावश्यक वस्तू सोडून ३१ मार्चपर्यंत बंद राहतील असा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, संपर्क आणि संसर्ग टाळणे हे आपल्याला करावे लागणार आहे. रेल्वे आणि बस या आपल्या शहराच्या वाहिन्या आहेत. जर रेल्वे बंद केली तर अत्यावश्यक सेवा पुरवणारे कर्मचारी आहेत, ते इच्छित स्थळी पोहोचणार नाहीत. त्यामुळे रेल्वे आणि बस सुरुच राहतील.
अत्यावश्यक सेवा पुरवणारा कर्माचारी काय करणार, आपली मोठी रुग्णालये, पालिका कर्मचारी आहेत यांची ने-आण कशी होणार, पाणी सोडणारे कसे येणार त्यामुळे या दोन सेवा सुरुच राहतील.
सरकारी कार्यालयातील कर्मचारी 50 टक्क्यावरुन 25 टक्क्यावर आणली आहे. शक्य तिथे वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश दिले आहेत. ज्या खासगी कंपन्यांना जे शक्य नाही त्या कंपन्या बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूर येथील जीवनावश्यक वस्तू सोडून सर्व ऑफिस, दुकाने 31 मार्चपर्यंत बंद राहणार आहेत, असा निर्णय आम्ही घेतला आहे. यामध्ये बँका चालू राहणार आहेत. यापुढे आर्थिक संकट येणार आहे. याचा मुकाबला कसा करायचा यावर उपाययोजना सुरु आहे. जी ऑफिस बंद होणार आहे, त्यांना मी विनंती करतो की आपण संकटातून बाहेर पडणार आहे तोपर्यंत कर्मचाऱ्यांचे वेतन बंद करु नका, ही माणुसकी सोडू नका. ज्या कारणामुळे आपण ट्रेन, बस आपण वापरत आहोत, ती कारणं आपण बंद केली आहेत. ऑफिस बंद झाल्याने जर लोक फिरायला जात असतील तर आम्हाला ट्रेन आणि बस बंद करावे लागतील, असं उद्धव ठाकरे म्हणाले.