Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान-मा:नरेंद्र मोदी यांच्या समवेत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे साधला संवाद.

0
4 0
Read Time5 Minute, 16 Second

मुंबई:-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान-मा:नरेंद्र मोदी यांच्या समवेत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे साधला संवाद. दिल्लीतील मरकज मध्ये सहभागी राज्यातील नागरिकांपर्यंत प्रशासन पोहोचले, त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवले. राज्यात लॉकडाऊनची पुरेपूर अंमलबजावणी करण्यात येत असल्याची दिली माहिती.सर्वधर्माच्या प्रमुख गुरू, धार्मिक नेत्यांना विनंती करून गर्दी होणार नाही, सामाजिक अंतर पाळले जाईल असे आवाहन करणे गरजेचे असल्याची मुख्यमंत्र्यांची सूचना. त्याचा उल्लेख करून पंतप्रधानांनी सर्व मुख्यमंत्र्यांना आपापल्या राज्यातील धार्मिक गुरूंशी तातडीने संवाद साधण्याचे केले आवाहन.लॉकडाऊन चा कालावधी संपल्यानंतर राज्य सरकारांनी नेमके कशा प्रकारे परिस्थिती ठेवावी याविषयीही मुख्यमंत्र्यांनी मागितले मार्गदर्शन. १५ एप्रिलपासून एकदम लॉकडाऊन न संपवता राज्यातील स्थितीनुसार टप्य्याटप्य्याने याचे नियोजन करण्याचे पंतप्रधानांचे निर्देश.लॉकडाऊन काळात नागरिकांचे मानसिक स्वास्थ्य चांगले असण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या मताला पंतप्रधानांनी केले अधोरेखित. लॉकडाऊननंतर एकदम लोंढे बाहेर दिसायला नकोत. सर्व काही व्यवस्थित सुरु झाल्याचे समजून लोक रस्त्यावर येतील असे न होऊ देण्याच्या पंतप्रधानांच्या सूचना.परराज्यातील श्रमिक, कामगारांची पुरेपूर काळजी. ३ हजार निवारा केंद्रांतून ३ लाख २५ हजार व्यक्तींना निवारा, दोन वेळेसचे भोजन. त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती. परराज्यात अडकलेल्या महाराष्ट्रातील लोकांनादेखील तिथेच राहण्याची विनंती- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फक्त कोरोना साठी सेव्हन हिल रुग्णालयात १५०० खाटांची सोय. येथे वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या निवासाचीही व्यवस्था. पुणे येथेही कोविड रुग्णालयाची उभारणी होणार. मुंबई महापालिका रुग्णालयांत आयसोलेशनसाठी केवळ २८ रुग्णशय्या होत्या, त्यामध्ये आता २१०० पर्यंत वाढ- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढील परिस्थितीच्या नियोजनाचा भाग म्हणून मुंबई महापालिकेकडून आरोग्य कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण यापूर्वीच सुरु. महापालिकेच्या ४ वैद्यकीय महाविद्यालये आणि नर्सिंगमधून एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना आम्ही विशेष कक्षासाठी तयार करीत आहोत- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती नव्या प्रोटोकॉलप्रमाणे लक्षणे नसणाऱ्या व्यक्तींचे देखील रुग्णालयाबाहेर विलगीकरण. त्यासाठी पालिका अधिकारी-पोलिसांच्या देखरेखीखाली लॉजेस, क्लब्स, मंगल कार्यालयांचा ताबा. गरज पडल्यास एखादी मोठी जागा निश्चित करून आयसोलेशन व क्वारंटाईन सुविधा उभारणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पूर्वी चाचण्या कमी होत असल्याने रुग्णांची संख्या कमी. आता खासगी प्रयोगशाळांना देखील चाचणीची परवानगी. त्यांचे दोन-तीन दिवसांचे निदान एकत्रितरित्या हाती येत असल्याने रुग्णांची संख्या अचानक वाढल्याचे चित्र. हे रुग्ण रुग्णालयांत दाखल, त्यांची प्रकृती स्थिर- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पीपीई किट्स, एन ९५ मास्क, इतर वैद्यकीय उपकरणांची गरज. स्थानिक पातळीवर काही आवश्यक उपकरणे तयार करणाऱ्या उद्योगांना प्रोत्साहन द्यावे, त्यांचे उत्पादन प्रमाणित करून मिळाल्यास आपण स्वतःची क्षमता निर्माण करू शकतो- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पंतप्रधानांना आवाहन

Happy
Happy
100 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: