म्युनिसिपल ऑफिस स्टॉप को-ऑप क्रेडिट सोसायटीत सहकार पॅनल चे वर्चस्व,चर्चा मात्र निकुंभ यांनी स्वीकारलेल्या पराभवाची…

संपादक गफ्फार मलिक(शेख)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
विजयी उमेदवार
१)नितीन नथ्थु सूर्यवंशी (५३)
२) वसंत रामराव देशमुख(४९)
३)अशोक गुलाबराव देशमुख(४७)
४)तुषार नारायण माने(४५)
५)मिर्जा महमूद बेग फत्तु बेग(४३)
६)मनोज निंबा पगारे(४३)
७)जाधव दिनेश राजधार(४६)
८)बापू बाबूलाल जाधव (२५)
९) यशोदा देवचंद पवार(बिनविरोध)
१०)दीपाली कृष्णराव देशमुख(बिनविरोध)
११)सुभाष मना आगोने (बिनविरोध

चाळीसगाव(प्रतिनिधी)- नुकत्याच झालेल्या चाळीसगाव म्युनिसिपल ऑफिस स्टॉप को-ऑप क्रेडिट सोसायटी चाळीसगाव च्या निवडणुकीत सहकार पॅनल ने परिवर्तन पॅनल विरोधात आपले वर्चस्व सिद्ध केले असून 11 पैकी 9 जागांवर विजय प्राप्त करून बहुमत प्राप्त केले आहे व परिवर्तन पॅनल ला फक्त 3 जागांवर समाधान मानावे लागले.
सहकार पॅनल चे पॅनल प्रमुख कृष्णराव पंडितराव अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढवली पॅनल प्रमुख असलेले कृष्णराव पंडितराव अहिरराव यांनी आपल्या कार्याच्या जोरावर व स्वभावाच्या ताकतीने हा विजय प्राप्त केला आहे,सहकार पॅनलने बहुमत मिळवले व विजय देखील प्राप्त केला मागील 10 वर्षांपासून सेक्रेटरी पदावर अहिराराव यांचे कार्य हे सुद्धा अति उत्तम असून त्यांच्या कार्याची पावती म्हणून त्यांच्या पॅनल ला पुन्हा संधी मिळाली आहे, नेहमी संस्थेच्या सभासदांचा विचार करत सुखदुःखात सहभागी होत संस्थेतर्फे मदत करण्यासाठी सेक्रेटरी म्हणून अहिराव हे पुढे असतात या विजयाचे संस्थेतील सर्व सभासद व मान्यवरांनी सहकार पॅनलचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
एक पराभव मन जिकणार ठरला आहे
या निवडणुकीत मात्र एक नाव न विसरण्यासारखे आहे ते म्हणजे सचिन अमृत निकुंभ यांनी या निवडणुकीत अनुसूचित जाती जमाती या प्रवर्गातून निवडणूक लढवीत बापू बाबूलाल जाधव दोघांची जोरदार लढत झाली, दोन्ही उमेदवारांना 25 25 मते मिळाली व निवडणूक अधिकाऱ्यांनी ईश्वरचिट्टी टाकण्याचा निर्णय घेतला मात्र निकुंभ यांनी ईश्वर चिट्ठी न सोडता मोठ्या मनाने जाधव यांना विजयाची माळ घातली आज आपण पाहतो की खुर्ची व पदासाठी भांडण होत असतात मात्र समान मते मिळून सुद्धा ईश्वर चिट्ठी न टाकू देता मोठ्या मनाने विरोधात उभे असलेल्या उमेदवारास विजय माळ टाकत समाजात नवीन पायंडा टाकण्याचा प्रयत्न निकुंभ यांनी केला असून निकुंभ यांच्या पराभवाची देखील चर्चा सहकार पॅनलच्या विजयासोबत केली जात आहे निकुंभ मनमिळाऊ स्वभावाचे व हसमुख अशी व्यक्तिमत्व आहे नेहमीच प्रत्येकाशी हित संबंध जोपासण्याचे कार्य निकुंभ करत असतात मात्र पराभव स्वीकारून सुद्धा एखाद्या विरोधात उभे असलेल्या उमेदवारास विजयी घोषित करण्यासाठी जे मन लागते ते मन सचिन निकुंभ यांच्याकडे आहे.