चाळीसगाव – राज्य शासनाने अनेक वेळा आवाहन करून देखील नागरिक रक्तदान करण्यास पुढे येत नाही मात्र देशाप्रती अस्था ठेवुन रक्तदान करावे असे आवाहन रयत सेने तर्फे नागरिकांना करतो .या संकटकालीन स्थितीत रक्तपुरवठ्यात घट होऊ नये व गरजूंना रक्त पुरवठा कमी पडे नये हे लक्षात घेऊन येथील रयत सेनेच्या वतीने दिनांक २८ /३/२०२० , व दि २९ /३/२०२० तसेच दि ३० रोजी तिसऱ्या दिवशी शहरातील जीवन सुरभी ब्लड बॅंकेत रक्तदान शिबिर सुरु आहे
रयत सेना सामाजिक कार्यात अग्रेसर राहुन जनतेला सेवा पुरविण्यास एक पाऊल पुढे असते सध्या कोरोनामुळे निर्माण झालेला संकटकालीन स्थितीत रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यास रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत चाळीसगाव डी बी पथकाचे संदिप तहसीलदार यांनी रक्तदान केले त्यांच्या देशाप्रती असलेल्या योगदानाला सलाम तसेच रयत सेनेचे कार्यकर्त् मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्यास सरसावले आहेत . गर्दी न करता टप्प्याटप्प्याने दाते रक्तदान करत आहेत किशोर पाटील,मयुर चौधरी,प्रशांत गायकवाड, शुभम पाटील,सागर पवार, सौरभ चव्हाण, शिवाजी पवार,सतीश पवार,विनोद पवार,अमोल पवार,रविन्द्र गोसावी, ,योगेश पाटील,चुनिलाल राठोड,अमोल सोनार ,रविन्द्र जाधव ,अमोल देठे ,जितेंद्र पवार, दत्ता पवार ,ज्ञानेश्वर कोल्हे, समाधान पाटील , कैलास सोनवणे, यांनी रक्तदान केले आहे रक्तदान शिबिरास चांगला प्रतिसाद लाभत असल्याने रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेशभाऊ पवार यांनी स्वइच्छे रक्तदान करणाऱ्या दात्याचे आभार मानले या शिबिरात जीवन सुरभी ब्लड बॅंकेचे डॉ दत्ता भदाणे ,असिफ खान ,हरीश बारगळ,कुणाल बुदेलखंडी आदि चे सहकार्य लाभत आहे यावेळी ज्ञानेश्वरी कॅंट्रक्सन संचालक सतिश पवार वाहिनी वैशाली पवार उपस्थित होते
Read Time2 Minute, 53 Second