संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
तालुक्यातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचीत राहणार नाही त्यासाठी मी प्रयत्नशील राहील – आमदार मंगेश चव्हाण..
चाळीसगाव (प्रतिनिधी) – चाळीसगाव शहर व तालुक्याला विकासाच्या उंचीवर नेण्यासाठी मी प्रयत्न करत असून लोकप्रतिनिधी या नात्याने माझ्या पर्यंत आलेल्या जनतेचे कामे करत आहे. तालुक्यातील एक ही विद्यार्थी शिक्षणापासून वंचीत राहणार नाही त्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील असे प्रतिपादन आमदार मंगेश चव्हाण यांनी केले.
शहरातील पवार वाडी स्थित विठ्ठल रुख्मिनी मंदिर सभागृह येथे नगरपरिषद मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांना रयत सेनेच्या वतीने दि ८ रोजी मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे पूजन आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातुन बोलताना रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार म्हणाले की रयत सेनेच्या माध्यमातून १० वर्षांपासून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासत आहोत. गरीब विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, ज्यांना शाळेची शैक्षणिक फी भरणे शक्य नाही अशा विद्यार्थ्यांची फी भरून अनेक गरीब विद्यार्थ्यांना मदत केली असून दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करताना समाधान लाभत असल्याचे सागितले.
कार्यक्रमास प. स. माजी सभापती संजय पाटील,भाजप शहर अध्यक्ष नितीन पाटील, डॉ संदीप देशमुख, शिवसेनेचे तालुका प्रमुख राहुल पाटील, उद्योजक संदीप जैन, पॉपूलर मेडिकल संचालक प्रदीप देशमुख, ऍड राहुल जाधव, रयत महिला सेनेच्या जिल्हा अध्यक्षा प्रा डॉ साधना निकम, खडकी बु पोलीस पाटील विनायक मांडोळे, शाहू मराठा संपादक प्रशांत गायकवाड, रयत भ्रष्टाचार निमूलन अध्यक्ष खुशाल पाटील, तरवाडे ग्रा प मा उपसरपंच नाना शिंदे, विठ्ठल रुख्मिनी संस्थानचे भिकन पवार, बाळू पवार सर, दीपक राजपूत, योगेश गव्हाणे, सचिन स्वार, अमोल मराठे,हर्षल चौधरी, सागर सूर्यवंशी, कपिल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते, नगरपरिषद शाळा क्र १, ४, ७, व १६ या मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांना आ. मंगेश चव्हाण यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. पुढे बोलताना आ मंगेश चव्हाण म्हणाले की तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा व नगरपरीषद शाळेचा विकास करण्याचा मानस असून त्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार आहे, तसेच समाजासाठी जे काही चांगले असेल ते करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील. विद्यार्थ्यांसाठी रयत सेनेने आयोजन केलेल्या शैक्षणिक साहित्य वाटपाच्या चांगल्या उपक्रमाला येण्याचा योग आला असे सांगत रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार व त्यांचे सहकारी चांगले उपक्रम राबवित असल्याने त्यांचे कौतुक केले, याप्रसंगी नगरपरिषद शाळा क्र १ व ४, ७,१६ मराठी शाळेचे शिक्षक अनिल पेठे ,राहुल परोसी, नितीन राठोड ,उमेश राजपूत, कैलास पाटील, राखी ठोके मॅडम , शितल गवळे मॅडम उपस्थित होत्या, कार्यक्रमास रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार ,प्रदेश समन्वयक पी एन पाटील प्रदेश सचिव प्रमोद वाघ ,जिल्हा उपाध्यक्ष स्वप्निल गायकवाड,अनिल कोल्हे, तालुका उपाध्यक्ष मुकुंद पवार,विलास मराठे, शहराध्यक्ष छोटू अहिरे, कार्याध्यक्ष प्रदीप मराठे, संघटक शिवाजी गवळी,मार्गदर्शक राजेंद्र पाटील, सहसंघटक दीपक देशमुख, आडगावचे शाखा अध्यक्ष राजेंद्र पाटील, विलास पाटील तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वप्निल गायकवाड, सुनील पवार ,दिलीप पवार, भूषण पाटील, अनिल कोल्हे, मुकुंद पवार ,प्रशांत अजबे , नामदेव कुमावत यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन नागमोती यांनी केले तर आभार प्रदीप मराठे यांनी मानले,