राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार रिपाइं (A) दौंड तालुकाध्यक्ष सचिन खरात यांना प्रदान
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
दौंड(प्रतिनिधी)-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) व दलित आदिवासी क्रांती दल यांच्या संयुक्त विद्यमाने दि 22 ऑगस्ट 2021 रोजी नाशिक चांदवड येथे भव्य मेळावा व राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा दिमाखात पार पडला त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिपकभाऊ निकाळजे उपस्थित होते मा दिपकभाऊ निकाळजे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले
विविध स्तरातील मान्यवरांना पुरस्कार मिळाले असून त्यामध्ये रिपाइं (A) दौंड तालुकाध्यक्ष सचिन भाऊ खरात यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यावेळी दलित आदिवासी क्रांती दल महाराष्ट्र व रिपाई चे वरिष्ठ पदाधिकारी मा बाळासाहेब पवार दादासाहेब ओव्हाळ, राजाभाऊ कटारे,प्रशांत तोरणे, प्रदीप सोनवणे, अशोक ससाणे, संतोष वाळके,व शेकडो कार्यकर्ते उपास्थित होते सचिन खरात यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत खरात यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार मिळाला असून या पुढेही असेच सामाजिक कार्य सुरू असल्याचे खरात यांनी अधिकार आमचा च्या प्रतिनिधी शी बोलतांना सांगितले.