Read Time1 Minute, 12 Second
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
मुंबई-मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत काही वेळ होत नाही तो पर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्री मंडळाची बैठक घेण्यात आली असून महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या कार्यास सुरवात केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळ बैठक झाली. पावसाळा सुरू असून शेतकरी संदर्भात राज्यातील खरीप हंगाम, पाऊस-पाणी आणि पीकविमा याबाबतचा आढावा यावेळी घेण्यात आला या आढावा बैठकीत मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव तसेच विविध विभागांचे सचिव देखील उपस्थित होते.
Post Views: 280