राज्यात कोरोनाच्या २२ नवीन रुग्णांची नोंद. एकूण रुग्णसंख्या २०३. या नवीन रुग्णांमध्ये सर्वाधिक १० रुग्ण मुंबईचे असून ५ रुग्ण पुण्याचे, ३ नागपूरचे, २ अहमदनगरचे तर सांगली, बुलढाणा, जळगाव येथील प्रत्येकी १ रुग्णाचा समावेश. कोरोनातून बरे झालेल्या ३५ रुग्णांना डिस्चार्ज.आज राज्यात दोघा कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू. एका ४० वर्षीय महिलेचा काल केईएम रुग्णालयात तीव्र श्वसनावरोधामुळे मृत्यू झाला होता. ती कोरोनाबाधित असल्याचे आज झाले निष्पन्न. बुलढाणा येथे एका ४५ वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू. तो मधुमेही होता. कोरोनाबाधित एकूण मृत्यूची संख्या ८. राज्यात आज एकूण ३९४ जण विविध रुग्णालयात उपचारार्थ भरती. १८ जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत ४२१० जण भरती.यापैकी ३४५३ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह तर २०३ जण पॉझिटिव्ह.आतापर्यंत ३५ कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज. सध्या राज्यात १७ हजार १५१ व्यक्ती घरगुती अलगीकरणात तर ९६० जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
Read Time0 Second