राष्ट्रवादी काँग्रेस च्या सामाजिक न्याय विभागाच्या चाळीसगाव शहराध्यक्ष पदी खुशाल मोरे

संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)-शहरातील सामाजिक कार्यकर्ते आणि युवा उद्योजक असलेल्या खुशाल बळीराम मोरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या चाळीसगाव शहराध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
खुशाल मोरे यांचा असलेला दांडगा जनसंपर्क व असलेली सामाजिक कार्याची आवड मागील अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात नेहमीच यांचा पुढाकार असतो यांनी सुरू ठेवलेल्या निरंतर समाज कार्याची दाखल घेत दि 13 ऑगस्ट 2023 रोजी नुकत्याच धुळे येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कार्यकर्त्या मेळाव्यात खुशाल मोरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश अध्यक्ष सुनिल मगरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष अरविंद भीमराव मानकरी यांनी नियुक्ती पत्र देत पक्ष वाढीसाठी व पक्षाची ध्येय धोरणे जनसामान्यांपर्यंत पोहोचवाल व आपले समाजकार्य निरंतर सुरू ठेवा असे सांगत अभिनंदन केले तसेच निवड झाल्यानंतर बोलतांना मोरे यांनी सांगितले की पक्षाने दिलेल्या जबाबदारीस तडा जाऊ देणार नाही व आता पर्यंत जे समाजकार्य सुरू होते ते निरंतर ठेवणार समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून जनसामान्यांना पक्षाच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेल या निवडीनंतर जबाबदारी वाढली असून प्रामाणिक पणे आपले कार्य करत राहणार.
या निवडीनंतर चाळीसगाव शहरातील विविध स्तरातून खुशाल मोरे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे