Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

‘राष्ट्रीयता’ व्हाट्सअॕप गृपचा नाविन्यपूर्ण उपक्रम-मयत शिक्षकाच्या परिवारास ग्रुपच्या सदस्यांनी केली ७५ हजाराची मदत

0
2 0
Read Time4 Minute, 51 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी गफ्फार शाह

चाळीसगाव-येथील राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मा.वि.शिरसगाव विद्यालयातील शिक्षक सचिन सोमसिंग पाटील(राजपूत) यांचे वयाच्या ३९व्या वर्षी अल्पशा आजाराने दुर्देवी मृत्यू झाल्याने त्यांच्या परिवारास ‘राष्ट्रीयता’ ह्या व्हाट्सअॕप गृपच्या शिक्षक सदस्यांमार्फत रुपये ७५ हजाराचा मदत निधी जमा करुन नुकताच देण्यात आला,स्व.सचिन राजपूत हे सन २००४ नंतर सेवेत नियुक्त झाले होते,म्हणून त्यांच्या परिवारास पेन्शन नसल्यामुळे ‘राष्ट्रीयता’शिक्षक गृपचे अॕडमिन अजिज खाटीक तथा आम आदमी पार्टीचे जिल्हाप्रमुख तुषार निकम तसेच शिक्षक बांधव प्रशांत पवार,भूषण साळुंखे,रुपेश फडतरे,प्रशांत शेलार,राजेंद्र चौधरी,प्रशांत पाटील,सुधिर देवरे,सतिश पाटील,प्रशांत आमले,अनमोल नानकर,भाजपा शिक्षक सेलचे तालुकाध्यक्ष विजय कदम,भिकन देशमुख,गंभीरराव पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने गृपवर आवाहन करण्यात आले,गृपमध्ये समाविष्ट सदस्यांपैकी १४१ शिक्षक बांधवांनी स्वेच्छेने भरिव अशी मदत पाटील परिवारास देण्याचे उदार असे दातृत्व दाखविले, सदरिल रुपये ७५ हजाराचा धनादेश नुकताच स्व.सचिन राजपूत यांच्या परिवारास देण्यात आला,यावेळी सह्याद्री प्रतिष्ठानचे मा.अध्यक्ष दिलीप घोरपडे,आम आदमी पार्टीचे जिल्हाप्रमुख तुषार निकम,शिक्षक भारतीचे तालुका कार्याध्यक्ष अजिज खाटीक,भूषण साळुंखे,रुपेश फडतरे,अनमोल नानकर,उपेंद्र पाटील,रामचंद्र गोसावी,गजानन मोरे,प्रोटाॕनचे तालुकाध्यक्ष हेमंत देवरे आदि उपस्थित होते.मदत निधीसाठी राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे संचालक आर्किटेक्ट धनंजय चव्हाण, उद्योजक निलेश निकम,जळगाव शिक्षक सोसायटीचे जेष्ठ संचालक अजय देशमुख,राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे जेष्ठ संचालक मनोहर सुर्यवंशी,प्राचार्य डाॕ.एस.आर.जाधव,मा.प्राचार्य विकास पाखले,माध्यमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र रणदिवे,मुख्याध्यापक ईश्वरलाल अहिरे,विरेंद्र वाघ,प्रा.हितेंद्र निकम,विष्णू चकोर,पारस चौधरी, प्रसन्न खंडाळे,भगवान ननावरे, बी.एल.ठाकरे,राजेंद्र शिंपी,अनिल देशमुख,जी.के.सानप,एच.व्ही.नानकर,श्रीमती एस.पी.ठाकूर,श्रीमती कुसूमावती पाटील,चंद्रकांत तायडे,ओमप्रकाश जाधव, भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनिल निकम, मा.नगरसेवक प्रा.संजय घोडेस्वार,जुक्टोचे मा.जिल्हा सदस्य प्रा.तुषार चव्हाण आदि मुख्याध्यापक व शिक्षक बांधवांचे अनमोल असे सहकार्य लाभले.सोशल मिडियाचा वापर नेहमी चुकीचा होतो असे म्हटले जाते,परंतु सकारात्मक विचारसरणी व गृप सदस्यांची सहकार्याची भावना असली तर एखादा व्हाट्सअॕपचा गृपही सामाजिक भान जपत असे सत्कार्य करु शकतो,हेच आपणास अजिज खाटीक यांच्या ‘राष्ट्रीयता’गृपच्या माध्यमातून दिसले,राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे आजी तथा माजी पदाधिका-यांनी गृपवरील सदरिल उपक्रमाचे कौतुक केले व पेन्शन नसलेल्या मयत शिक्षकाच्या परिवारासाठी गृप सदस्य व मदतनिधी समूहाचे कार्य उल्लेखनीय आहे असे सांगितले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: