अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार मलिक
चाळीसगाव प्रतिनिधी – शासनाच्या वतीने बीपीएल अंत्योदय तसेच केशरी कार्डधारकांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा अंतर्गत कमी भावात गहू, तांदूळ अदि रेशनचे धान्य मिळते गेल्या काही महिन्यांपासून चाळीसगाव तहसील कार्यालयात सहा ते सात हजार केसरी कार्डधारकांनी राष्ट्रीय अन्नसुरक्षा अंतर्गत स्वस्त धान्य मिळावे या करीता अर्ज केले आहेत. अद्याप पावेतो या अर्जधारकांना कुठल्याही प्रकारचे या योजनेतील कमी भावाच्या धान्याचा लाभ मिळत नसल्याने ते धान्याच्या लाभापासुन वंचित राहत असल्याने त्यांना तात्काळ राष्ट्रीय अन्नसुरक्षा अंतर्गत स्वस्त धान्य देण्यात यावे यासाठी तहसीलदार अमोल मोरे यांना रयत सेनेच्या वतीने दि २३ रोजी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.
चाळीसगाव तहसील कार्यालयात सहा ते सात हजार कष्टकरी नागरिकांनी केसरी कार्डधारकांनी राष्ट्रीय अन्नसुरक्षा अंतर्गत स्वस्त धान्य मिळावे या करीता अर्ज केले आहेत. अद्याप पावेतो या अर्जधारकांना कुठल्याही प्रकारचे या योजनेतील कमी भावाच्या धान्याचा लाभ मिळत नाही याबाबत महसूल यंत्रणेला विचारणा केली असता शासनाच्या वतीने दिलेला रेशन मालाचा कोटा पूर्ण झाल्यामुळे नवीन अर्जदारांना कमी भावाने धान्य देता येत नाही. असे अनेक दिवसांपासून सांगण्यात येते . मात्र दुसरीकडे राष्ट्रीय अन्नसुरक्षा अंतर्गत अनेक नागरिक या योजनेत बसत नसताना देखील धान्याचा लाभ घेत आहेत. अशा श्रीमंत धनाढ्य लाभार्थीची चौकशी करून त्यांचे धान्य बंद करण्यात यावेत. चाळीसगाव तालुक्यातील सहा ते सात हजार कार्डधारकांनी केलेल्या अर्जानुसार राष्ट्रीय अन्नसुरक्षा अंतर्गत वाढीव कोटा गरीब जनतेला लवकरात लवकर या योजनेचा लाभ मिळवून द्यावा असे न झाल्यास रयत सेनेच्या वतीने चाळीसगाव तहसील कार्यालया समोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल या प्रसंगी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास तहसील प्रशासन जबाबदार राहणार असल्याचे रयत सेनेच्या वतीने चाळीसगाव तहसीलदार अमोल मोरे यांना दि २३ रोजी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनाच्या प्रत खासदार जळगाव, आमदार, चाळीसगाव, शहर पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन यांना देण्यात आल्या आहेत. निवेदनावर रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, प्रदेश समन्वयक पी एन पाटील, छोटू आहिरे, दीपक देशमुख, राजेंद्र गवळी,सोनु देशमुख ,प्रभाकर शेलार, प्रशांत अजबे, समाधान पाटील यांच्या सह्या आहेत.