अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी) राष्ट्रीय कन्या शाळा येथे दिनांक 12 जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ जयंती निमित्त विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अखिल भारतीय मराठा महासंघ चाळीसगाव शहर यांनी सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी,म्हणून सहभागी विद्यार्थ्यांना पारितोषिक व सन्मानपत्र वाटप करण्यात आले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिनांक 12 जानेवारी 2022 रोजी राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त राष्ट्रीय कन्या शाळा चाळीसगांव यांनी भाषण, कविता, गाणे, एकांकिका व गझल या स्पर्धेचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी प्राचार्य डॉ. सौ. साधना निकम मॅडम व प्रमुख उपस्थिती अखिल भारतीय मराठा महासंघाचे शहराध्यक्ष खुशाल बिडे, शहर उपाध्यक्ष जगदीश वाघ, शहर सचिव रामचंद्र सूर्यवंशी, सह सचिव दत्तात्रय जगताप ,शहर कोषाध्यक्ष विजय पाटील, सल्लागार नामदेव तुपे, शहरकार्याध्यक्ष सिद्धांत पाटील, शहर संघटक गणेश गुंजाळ, मोतीलाल मांडोळे, दिपक शेटे, प्रसिद्धीप्रमुख सागर जाधव सन्माननीय चाळीसगाव शहर सदस्य हिरामण मांढरे, वसंतराव काळे, पंडित पाटील, बाळू पवार सर व आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या पर्यवेक्षक पदी विजय पवार सर, सा. का. प्रमुख सौ अनिता ताई पाटील व सौ वंदनाताई निकम, कार्यक्रमाचे आयोजक सौ.सुनीता देशमुख, सौ.शोभना मोरकर, सौ.वृंदा थोरात, सौ. पुष्पलता शर्मा. परिक्षक श्री नेवरे सर, सौ. अंजली पाटील फोटोग्राफी प्रदीप वाबळे सर. सूत्रसंचालन शाळेतील विद्यार्थिनी विशाखा कुमावत, भूमी बेहरे यांनी केले. विविध स्पर्धेचे विद्यार्थ्यांचे सादरीकरण झाल्यानंतर अखिल भारतीय मराठा महासंघाच्या शहराध्यक्ष खुशाल बिडे यांच्या विनंतीवरून प्राचार्य डॉ. सौ. साधनाताई निकम यांनी कार्यक्रमाचा निकाल जाहीर केला. प्रथम पारितोषिक अनुराधा अभय कसबे, दृतिय पारितोषिक लीना साईनाथ जाधव, तृतीय पारितोषिक रुचिता प्रशांत गायकवाड, चतुर्थ पारितोषिक साक्षी मुकेश पाटील व शेवटचे पारितोषिक ट्विंकल शालिक पगार . या विद्यार्थिनींना अखिल भारतीय मराठा महासंघाचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांच्या हस्ते पारितोषिक व सन्मानपत्र वितरण करण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. सौ. साधनाताई निकम यांनी अखिल भारतीय मराठा महासंघ चाळीसगाव शहर त्यांना परवानगी दिली त्याबद्दल शहराध्यक्ष खुशाल बिडे व सर्वांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मान्यवर व सर्व गुरुजन वर्ग सहभागी विद्यार्थीनी यांचे आभार प्रदर्शन मंगला पगार मॅडम यांनी केले.