रेल्वे लाईन पलीकडील नागरीवस्ती साठी रेल्वे ब्रिज बणविण्याची खासदार उन्मेश पाटील यांच्या कडे रयत सेनेची मागणी

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख(मलिक)
चाळीसगाव(प्रतिनिधी) – शहराच्या रेल्वे लाईन पलीकडे विमानतळ,नवलेवाडी परीसरात दहा ते पंधरा हजार लोकसंख्या असलेल्या नागरी वस्तीसाठी रोज येण्या व जाण्यासाठी रेल्वे लाईन ओलांडून जावे व यावे लागते त्यामुळे विद्यार्थी व नागरीकांच्या जिवितास हानी पोहचू शकते म्हणून रेल्वे लाईनवर ब्रिज ( जिना) बनविण्याची मागणी खासदार उन्मेशदादा पाटील यांच्याकडे दि २१ रोजी रयत सेनेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
विमानतळ व नवलेवाडी ह्या भागात येण्यासाठी जवळचा मार्ग नसल्यामुळे रेल्वे पुलावरून या परीसरात येण्यासाठी जवळपास ४ किलोमीटरचे अंतरपार करून जावे व यावे लागते. जवळचा रस्ता म्हणून दुसरा मार्ग नाही. यामुळे रेल्वे लाईन ओलांडून किमान दोन वेळा विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालयात जावे लागते त्याच बरोबर नागरिकांना देखील बाजार असेल किंवा इतर कामासाठी बाजारपेठत जावे व यावे लागत असल्यामुळे विद्यार्थी व नागरीकांच्या जिवितास हानी पोहचू शकते. नवलेवाडी, महाराणा प्रताप हाउसिंग सोसायटी, महात्मा फुले नगर, मित्र टाईप, मिलिंद नगर, वृंदावन नगर, प्रबुद्ध नगर, बजाज नगर, रामकृष्ण नगर, बालाजी नगर या परीसरातील विद्यार्थी व नागरिकांसाठी रेल्वे लाईनवर जिना ( दादरा ) गणेश कॉलनी ते नवलेवाडीतील मुख्य रस्त्यापर्यंत रेल्वेविभागाच्या वतीने बसविण्यात यावे यासाठी खासदार साहेबांनी रेल्वेविभाग व रेल्वेमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून रेल्वे लाईन पलीकडील नागरीकांसाठी रेल्वे लाईनवर ब्रिज ( जीना )ची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी खासदार उन्मेशदादा पाटील यांच्याकडे दि २१ रोजी रयत सेनेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.निवेदनावर रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार,भ्रष्टाचार निर्मूलन सेनेचे प्रदेश अध्यक्ष खुशाल पाटील,जिल्हाउपाध्यक्ष अनिल कोल्हे,कामगार सेनेचे तालुकाअध्यक्ष संजय हिरेकर,तालुकाउपाध्यक्ष भरत नवले,मुकुंद पवार,शहरअध्यक्ष छोटु अहिरे,शहर संघटक दिपक देशमुख,पांडुरंग हिरे,
मधुकर मोरे,
वसंत बाविस्कर यांच्यासह रयत सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.