रेशनच्या तांदळाची बाजारात विक्री साठी निघलेल्या तांदूळ,ट्रक सह १६ लाख ९० हजार ९० रुपयांचा मुद्देमाल जप्त सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री अभयसिंह देशमुख यांची कारवाई

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार मलिक(शेख)
सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री अभयसिंह देशमुख यांची कारवाई,पुरवठा निरीक्षक यांच्या फिर्यादीवरून आरोपी १ ) निलेश उर्फ पप्पु सुरेश वाणी २ ) रफीक शहा गफ्फुर शहा ( ड्रायव्हर ) दोन्ही राहणार उंबरखेड यांचे विरूध्द जिवनावश्यक वस्तु अधिनियम १९५५ चे कलम ३,७ प्रमाणे दिनांक २० डिसेंबर २०२२ रोजी मेहुणबारे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
उंबरखेड(चाळीसगाव)-दि १५ डिसेंबर २०२२ रोजी रात्री सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री अभयसिंह देशमुख चाळीसगाव उपविभाग यांना गुप्त बातमी मिळली कि , उंबरखेड ते आडगाव रोडलगत निलेश ऊर्फ पप्पू सुरेश वाणी यांचे मालकीच्या गोडावुन मध्ये तो माल ट्रक क्रमांक एमएच – १८ – एसी -१ ९११ मध्ये बेकायदेशिर रित्या शासकीय वितरण प्रणालीचा तांदुळ भरुन खुल्या बाजारात विक्रीसाठी घेवून जात आहे . त्यावरून अभयसिंह देशमुख साहेब सोबत ASI भाऊसाहेब पाटील , पोहेकॉ संदीप पाटील , पोकॉ अमोल पाटील , तसेच तहसिलदार श्री अमोल मोरे चाळीसगाव , तलाठी दिनेश येडे , तलाठी रविन्द्र ननवरे वाहन चालक मिर्झा व २ पंच तसेच सपोनि विष्णु आव्हाड , पो.उप निरी . प्रकाश चव्हाणके , निलेश लोहार , संजय पाटील , यांचेसह जावुन दि . १६ डिसेंबर २०२२ रोजी रात्री न ००.३० वाजता छापा टाकला असता ट्रक क्रमांक एमएच – १८ -एसी -१९११ मध्ये बेकायदेशिर रित्या शासकीय वितरण प्रणालीचा तांदुळ आढळून आला सपोनि विष्णू आव्हाड यांनी पंचनामा करून सदरचा ट्रक डिटेन केला . त्यानंतर पुरवठा निरीक्षक , राजेंन्द्र रामदास ढोले वय ५५ पुरवठा निरीक्षण अधिकारी , चाळीसगाव जि . जळगाव यांनी खात्री करून नमुणे तपासणी करून सविस्तर पंचनामा व अहवाल तयार करून मालट्रकमध्ये तसेच खाजगी गोडावुनमध्ये मिळुन आलेल्या एकुण ४लाख ५६ हजार ३९० रुपये किमतीचा तांदुळ ट्रकमध्ये तसेच ९ लाख ५० हजार रूपये किंमतीची मालट्रक तसेच , २लाख १४ हजार ५६० रूपये किमंतीचा तांदुळ गोडावुनमध्ये असा एकुण १६ लाख २९ हजार ९० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन आरोपी १ ) निलेश उर्फ पप्पु सुरेश वाणी २ ) रफीक शहा गफ्फुर शहा ( ड्रायव्हर ) दोन्ही राहणार उंबरखेड यांचे विरूध्द जिवनावश्यक वस्तु अधिनियम १९५५ चे कलम ३,७ प्रमाणे दिनांक २० डिसेंबर २०२२ रोजी मेहुणबारे पोलीस स्टेशनला राजेंन्द्र रामदास ढोले पुरवठा निरीक्षण अधिकारी , चाळीसगाव जि . जळगाव यांनी फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास मा . पोलीस अधिक्षक जळगाव , मा . अपर पोलीस अधिक्षक , चाळीसगाव व सहाय्यक पोलीस अधिक्षक चाळीसगाव उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली पो . उप निरीक्षक प्रकाश चव्हाणके हे करीत आहेत . गोपणीय माहीती द्यावयायची असल्यास उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय चाळीसगाव उपविभाग येथे संपर्क साधणे बाबत आव्हाण अभयसिंह देशमुख साहेब यांनी केले आहे .