
रेशनिंग संदर्भातील तक्रारी अथवा माहिती मिळविण्यासाठी आता हेल्पलाईन जाहिर
जळगाव दि. 11 – कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नागरीकांना स्वस्त धान्य मिळण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येवू नये. याकरीता शासन व जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. नागरीकांना काही अडचण आल्यास त्यांच्या अडीअडचणीचे निराकरण करण्यासाठी, रेशनिंग(PDS) संदर्भातील तक्रारी नोंदविणे, रेशनची माहिती मिळविण्यासाठी हेल्पलाईन उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
राज्यात रेशनिंगसाठी राज्यस्तरीय हेल्पलाईन कार्यरत आहे. मात्र, कोरोना महामारी नियंत्रनासाठी लागू केलेल्या लॉकडाऊन कालावधीत शिधावस्तू उपलब्धतेचे सनियंत्रण करताना रेशनिंग हेल्पलाईन बाबतीत जनतेत जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे. यानुसार जिल्ह्यातील सर्व जनतेस आवाहन करण्यात येते की, रेशनिंग साठीच्या तक्रारीसाठी, रेशनिंगची माहिती मिळविण्यासाठी खालील हेल्पलाईन क्रमांकाचा वापर करावा किंवा ईमेल वा ऑनलाईन तक्रार प्रणालीचा वापर करून आपली तक्रार नोंदवावी. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले आहे.
(1) राज्य हेल्पलाईन
कामाचा कालावधी – सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. हेल्पलाईन क्रमांक- 1800 22 4950/1967 (नि:शुल्क) अन्य हेल्पलाईन क्रमांक- 022- 23720582/23722970/23722483, ईमेल- helpline.mhpds@gov.in ऑनलाइन तक्रार नोंदविणेसाठी mahafood.gov.in वेबसाईटवर वरील ऑनलाइन तक्रार निवारण प्रणाली याचा वापर करावा.
(2) मुंबई – ठाणे शिधावाटप क्षेत्र नियंत्रण कक्ष
कामाचा कालावधी-सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत. हेल्पलाईन क्रमांक- 022-22852814
ईमेल- dycor.ho.mum@gov.in,
(3) जळगाव जिल्ह्याकरीता पुरवठा विभाग व्हॅटसअप क्रमांक -9307592572 असा असून जिल्हा पुरवठा शाखा, जळगाव लँडलाईन क्रमांक 0257-2229708 हा आहे.

Related
More Stories
500 कोटी जलसाठा टीम च्या वतीने नदी पात्राची सफाई,सायकलिंग ग्रुप च्या वतीने 76 हजाराचे योगदान…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव(प्रतिनिधी)- शहरातील तितूर व डोंगरी नदी पत्र अरुंद झाल्यामुळे मागच्या वर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे...
गावठी दारू सह 4 लाख 71 हजार 350 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त यवत पोलिसांची कामगिरी
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक यवत-दि 13 मे 2022 रोजी गावठी हातभटटी दारूची वाहतुक करणाऱ्याला अटक करत,चार लाख...
चाळीसगाव येथे मंगळग्रह मूर्तीची प्राणप्रतिष्ठा,14 मे रोजी महाप्रसादाचे आयोजन…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव(प्रतिनिधी)-शहरातील गांधी चौक येथील महादेव मंदिराराजवळ आज दिनांक 13 रोजी मंगळग्रह मूर्तीची प्रतिष्ठापना...
जिल्हा रुग्णालयात कैद्यांची हाणामारी, 4 पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक जळगाव- जिल्हा रूग्णालयात कैद्यांच्या दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा कर्तव्यात कसूर...
धक्कादायक शहरात बोगस क्लीनिकल लॅब व पॅथॉलॉजीस्ट चा सुळसुळाट, आरोग्य यंत्रणा गप्प का?
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगांव(प्रतिनिधी)-कुठलाही छोटा-मोठा आजार असो, अनेकदा आजाराचे अचूक आणि योग्य निदान होण्यासाठी रुग्णांच्या विविध...
विविध क्षेत्रातील ४३ मान्यवरांचा आदिलशाह फारुकी बहुउद्देशीय संस्थेतर्फे डॉ एपीजे अब्दुल कलाम पुरस्काराने सन्मान
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक जळगांव-जळगाव जिल्ह्यातील अडावद येथील नामांकित "आदिलशाह फारुकी बहुउद्देशीय संस्थे" मार्फत रविवार ८ मे...
Average Rating