अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)-तालुक्यातील डामरून गावातील तरुणास लग्नाचे आमिष दाखवत 2 लाख 40 हजार घेऊन होणारी वधू सहकार्या सोबत फरार झाली होती दि 2 डिसेंबर ला ग्रामीण पोलिसांनी केली दोन्ही आरोपींना अटक
अशा प्रकारे एजंटआरोपी हे आजुबाजुच्या परिसरातील विवाहास ईच्छुक लोकांची माहीती काढुन त्यांचे लग्न जमवुन देण्यासाठी सर्वसामान्य लोकांचा विश्वास संपादन करुन त्यांचे मानसिकतेचा फायदा घेवुन त्यांना लग्नासाठी वेगवेगळ्या मुली दाखवुन त्यांचा विवाह करण्याचा बहाणा करुन त्यांचेकडुन पैसे घेवुन लाखो रुपयांची फसवणुक करुन सर्वसामान्य जनतेची फसवणुक करत आहेत. त्यामुळे चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने सर्व लोकांना आवाहन करण्यात येत आहे की, अशा प्रकारे लोकांच्या सांगण्यावर विश्वास ठेवु नये व ज्या लोकांची अशा प्रकारे फसवणुक झाली असेल त्यांनी संबंधीत पोलीस स्टेशन येथे जावुन रितसर तक्रार करावी-चाळीसगांव ग्रामीण पोलीस निरीक्षक श्री संजय ठेंगे
सदर गुन्ह्यातील फिर्यादी घनश्याम मुरलीधर पाटील वय 28 वर्षे ,धंदा शेती ,राहणार डमरूण ता चाळीसगांव जिल्हा जळगांव यांनी दिलेल्या फिर्यादी वरून दि 25 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता दि 2 ऑक्टोबर 2021 रोजीच्या सकाळी 7 वाजे दरम्यान डामरूण येथून घनश्याम पाटील यांच्या राहत्या घरातून विश्वास संपादन करत आरोपी वधू वय 31 राहणार सुंदरवाडी चिखलठाण जिल्हा औरंगाबाद व किरण भास्कर पाटील उर्फ बापू पाटील वय 45 रा आमडदे ता भडगाव जिल्हा जळगांव यांनी बनवा बनवी करत लग्नाचे आमिष दाखवत घनश्याम पाटील यांच्या कडून सोन्या चांदीचे दागिने एकूण 2 लाख 40 हजार किमतीचा ऐवज घेत काही न सांगता निघून गेले,शोधा शोध करत फसवणूक झाल्याचे लक्षात येताच घनश्याम पाटील यांनी पोलीस ठाणे गाठत सर्व हकीकत सांगितली घनश्याम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कलम 420,419,406,120(4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी आरोपींना दि 2 डिसेंबर 2021 रोजी अटक करत मा न्यायालयात हजर केले असता 6 डिसेंबर 2021 पर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आली आहे
सदर गुन्ह्याचा तपास मा.पोलीस अधिक्षक सो. श्री प्रविण मुंडे साहेब यांचे निर्देशानुसार व मा.अप्पर पोलीस अधिक्षक सो. श्री रमेश चोपडे साहेब चाळीसगाव परिमंडळ, चाळीसगाव तसेच पोलीस मा.उपविभागीय पोलीस अधिकारी सो.श्री कैलास गावडे साहेब यांचे मार्गदर्शन व मा.पोलीस निरीक्षक श्री संजय ठेंगे यांचे आदेशाने पो.हे.कॉ.विजय महादु शिंदे हे करीत आहे.