लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईने शहरात चौथा लाचखोर आऊट,लाचखोरी थांबली नाही तर लाचखोरांची टीम ऑल आऊट होणार…

चाळीसगाव(प्रतिनिधी)- तालुक्यात लाच खोरी थांबायला तयार नाही, एकापाठोपाठ चौथा लाचखोर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्याने तालुक्यात खळबळ उडाली असून लाचखोरांची लाचखोरी काही थांबेना मात्र जागृत नागरिकांच्या सहकार्याने व लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या प्रयत्नांनी या लाचखोरीला येणाऱ्या काळात ब्रेक लागेल यात शंका नाही.पुरुष तक्रारदार वय- 41 रा. करगाव ता.चाळीसगांव जि.जळगाव यांनी श्रीकांत गुलाब पवार, वय 38, ग्रंथपाल माध्यमिक आश्रम शाळा करगाव ता. चाळीसगांव जि.जळगांव वर्ग-3 यांनी 12 हजार लाचेची मागणी केली असल्याची तक्रार केली होती त्या अनुषंगाने लाच लुचपत प्रतिबंधक विभाग जळगांव यांनी सापळा रचत 7 हजार रुपयांची लाच घेतांना आरोपी लोकसेवकास अटक केली आहे.
तक्रारदार यांची कालबध्द वेतनश्रेणी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग जळगाव या कार्यालयाकडून मंजूर करून आणण्यासाठी यातील आलोसे यांनी या अगोदर फोन पे वर 15 हजार रुपये घेतले होते. व त्यानंतर मा.प्रादेशिक उपसंचालक इतर मागासवर्गीय विभाग नाशिक, येथून पदोन्नती चे थकीत रक्कम 8 हजार 519 रुपये मंजूर करून आणून देतो.त्यासाठी फरकाचा बिलाच्या 16 % प्रमाणे पंचासमक्ष 12 हजार रुपयांची लाचेची मागणी करून यातील आरोपी लोकसेवक यांनी पंचा समक्ष पहिला हप्ता म्हणून 7 हजार रुपये स्वतः स्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यांचे वर चाळीसगांव ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे. हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.सापळा पर्यवेक्षण अधिकारी
श्री.सुहास देशमुख,पोलिस उप अधीक्षक,ला.प्र.वि. जळगांव,सापळा व तपास अधिकारी अमोल वालझाडे,पोलिस निरीक्षक,ला.प्र.वि. जळगांव यांनी
पो.ना.सुनिल वानखेडे, पो.ना. बाळू मराठे, पोकॉ राकेश दुसाने हे पथक तयार करून,मदत पथक एन.एन. जाधव, पोलीस निरीक्षक,स.फौ. दिनेशसिंग पाटील स.फौ.सुरेश पाटील, पो.ह.रविंद्र घुगे,म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.किशोर महाजन,पो.कॉ. प्रदीप पोळ,पो.कॉ. सचिन चाटे, पो. कॉ.प्रणेश ठाकुर यांच्या सह यशस्वी सापळा रचत कारवाई केली.यावेळी मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.मा.श्री माधव रेड्डी अप्पर पोलिस अधिक्षक ,ला प्र वि नाशिक परिक्षेत्र नाशिक, श्री.नरेंद्र पवार साो., वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.यांचे मार्गदर्शन लाभले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईने शहरात चौथा लाचखोर आऊट झाला असून लाचखोरी थांबली नाही तर लाचखोरांची टीम ऑल आऊट होणार अशी चर्चा शहरात सुरू आहे.
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.
अँन्टी करप्शन ब्युरो,जळगाव. अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगांव
दुरध्वनी क्रं. 0257-2235477
@ मोबा.क्रं. 8806643000
@ टोल फ्रि क्रं. 1064