अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
दौंड ग्रामीण प्रतिनिधी मयूर साळवे,सचिन रानसिंग

दौंड तालुक्यातील ग्रामपंचायत लिंगाळी येथील ग्रामसेवक मच्छिंद्र निगडे यांना निवेदन देण्यात आले,लिंगाळी ग्रामपंचायत चे माजी सदस्य राजू माने यांनी बालाजी नगर येथील साचणारे सांडपाणी व कचरा यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते आता ची परिस्थिती लक्षात घेता लोकांना य सुरक्षित ठेवण्याचा भावनेतून तसेच जून महिना जवळ आला आहे पावसाळ्यात इतर रोगांचा नागरिकांना त्रास होऊ शकतो तरी लवकरात लवकर येथील सांडपाणी व कचऱ्याची व्यवस्था करण्यात यावी असे निवेदन ग्रामसेवक मच्छिंद्र निगडे यांना देण्यात आले
