लोककल्याण आधार मंच महाराष्ट्र राज्य व नगरपरिषद दौंड यांच्यावतीने ग्राहक जनजागृती अभ्यास वर्गाचे आयोजन

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
शहर प्रतिनिधी विजय जाधव
दौंड(प्रतिनिधी)- लोककल्याण आधार मंच महाराष्ट्र राज्य व नगरपरिषद कार्यालय दौंड यांच्यावतीने ग्राहक जनजागृती अभ्यास वर्गाचे आयोजन सिंधी मंगल कार्यालय दौंड येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष व उद्घाटक म्हणून दौंड नगर परिषदेचे मुख्यअधिकारी डॉ. संतोष टेंगले, ग्राहक समिती पुणे जिल्हा सदस्य प्रमोद जाधव, वीज वितरण सहाय्यक अभियंता वैभव पाटील, लोककल्याण आधार मंच महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष प्रमोद शितोळे, तसेच दौंड तालुका अध्यक्ष नामदेवराव जठार- पाटील, संचालक गोरख शितोळे, तसेच लोक कल्याण आधार म्हणजे तर्फे विविध शहरातून आलेले अध्यक्ष सदस्य उपस्थित होते. दौंड शहरातील ग्राहकांमध्ये जनजागृती करण्यासाठी सदर अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. उपक्रमाला दौंड शहरातील कार्यरत बचत गटांमधील महिला सदस्यांनी सहभाग नोंदवला. माझी वसुंधरा अभियान अंतर्गत सोलार पॅनेल, सोलार रूफटॉप बसवण्यात यावेत यावर आधारित योजनांविषयी सहाय्यक अभियंता वैभव पाटील सरांनी मार्गदर्शन केले. ग्राहक संरक्षण कायदा विषयी मार्गदर्शन करताना, 799 रुपयांची वस्तू असल्यास 799 रुपयाला ती वस्तू विकत घेणे गरजेचे आहे जर 800 रुपये दुकानदारास दिले तर माघारी एक रुपया घेणे हा ग्राहकाचा अधिकार आहे. ग्राहकांनी खरेदी करताना मॅन्युफॅक्चरिंग डेट, प्राईस आणि एक्सपायरी डेट बघूनच पदार्थ वस्तू खरेदी करणे आवश्यक आहे. तसेच पारदर्शक व्यवहार कसा करावा? याबाबत प्रमोद जाधव सरांनी मार्गदर्शन केले.
लोक कल्याण आधार मंच तर्फे आलेल्या सर्व सदस्यांनी, नगरपरिषद अधिकाऱ्यांनी ग्राहक जनजागृती अभ्यास वर्गाचे महत्त्व अधोरेखित केले. भविष्यात अशा वर्गांचे यशस्वी आयोजन होणे आवश्यक आहे आणि दौंड शहरात असे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी नगरपरिषदेच्या वतीने नेहमीच सहाय्य केले जाईल अशा शब्दात मुख्यअधिकारी डॉ. संतोष टेंगले सरांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन दिनेश पवार आणि दीपक म्हस्के यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंजली कांबळे, ज्योतीताई मोकळ, सुरैय्या बेगम शेख, विद्या भुजबळ, तृप्ती साळुंखे, हनुमंत गुंड,गोरख शितोळे, विजय नाळे,शुभम चौकटे तसेच लोक कल्याण आधार मंचच्या सर्व सदस्यांनी प्रयत्न केले.