अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
दौंड(प्रतिनिधी)-वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज माध्यमिक विद्यामंदिर, दौंड येथे स्वच्छ सर्वेक्षण २०२३, माझी वसुंधरा अभियान ३.० आणि शहर सौंदर्यीकरण अभियान अंतर्गत चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
चित्रकला स्पर्धेमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सदर स्पर्धा सुरू असताना सर्व विद्यार्थ्यांना शिस्तीत, कचरा करू न देता, सुंदर चित्रे काढण्यासाठी शाळेतील शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी प्रोत्साहित केले. शाळेचा सुंदर परीसर स्वच्छ राखण्यासाठी विद्यार्थ्यांची मदत घेऊन शिस्तीत मस्ती कशी करायची?, हि शिकवण मुख्याध्यापकांनी शाळेला दिल्याचे कृतीतून दाखवून दिले.चित्रकला स्पर्धेचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक अनिल धामणे, कलाशिक्षक संंजय कांबळे, दादासाहेब काळे, पोपट दराडे, राजेंंद्र भोसले, किशोर सुरते इ. शिक्षकवृंद उपस्थित होते.