अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)-क्राईम अँड करप्शन कंट्रोल असोसिएशनच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहिती नुसार वनपरिक्षेत्र अधिकारी (पाटणा ) श्री.एम.डी.चव्हाण तसेच त्यांचे सहकारी वनमजुर जगन मोरकर व वनमजुर रामचंद्र पाटील यांनी संगन मताने , दिनांक २६/१२/२०२० रोजी पाटणादेवी अभयारण्य (संरक्षित क्षेत्र) येथे दिवसा ढवळ्या पथीकाश्रम येथील जुन्या नर्सरीतील काही जिवंत झाडांची इलेक्ट्रिक कटर च्या सहाय्याने कत्तल केली व दुसऱ्या दिवशी ट्रॅक्टर ट्रॉलीच्या साहाय्याने पिंपरखेड येथील एका लाकूड व्यापाऱ्यास रुपये तीस हजाराला(30000) विकली असल्याचा आरोप क्राईम अँड करप्शन कंट्रोल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे. ही अतिशय गंभीर बाब समजताच क्राईम अँड करप्शन कंट्रोल असोसिएशनच्या जिल्ह्या अधिकाऱ्यांनी क्राईम अँड करप्शन कंट्रोल असोसिएशनच्या राष्ट्रीय मुख्य तपास अधिकाऱ्यांना सदर तक्रार पाठवली तक्राची गंभीरता लक्षात घेऊन त्वरित राष्ट्रीय अध्यक्ष दिनेश गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली प्रधान मुख्य वन संरक्षक ( वन्यजीव) नागपूर तसेच अपर प्रधान मुख्य संरक्षक पश्चिम विभाग मुंबई , विभागीय वन संरक्षक औरंगाबाद तसेच श्री राजेश ठोंबरे मानद वन्यजीव रक्षक जळगाव यांना सदर तक्रार पुराव्यानिशी सादर केली. भारतीय दंड संहिते नुसार संरक्षित क्षेत्रात असे कृत्य करणे हा दंडनीय अपराध आहे .
१) वन्य जीव संरक्षण अधिनियम 1972 कलम 27 व 29
२) भारतीय वन अधिनियम 1927 कलम 26 (1) (d) अपप्रवेश, (F) अवैध वृक्ष तोड ,66 ( A) गुन्ह्यात अप्रत्यक्ष सहभाग , 41 – अवैध वाहतूक , वन्य जीव अभयारण्य क्षेत्रात आग लावणे कलम 32 ह्या सर्व बाबी लक्षात घेता कर्तव्यदक्ष वरीष्ठ सर्व अधिकाऱ्यांनी ही गंभीर बाब असून त्यावर लगेच कारवाई सुरू केली. ह्या तक्रारीच्या चौकशी कामी विभागीय वन अधिकारी यांनी समिती स्थापन केली असून 2 दिवसात अहवाल सादर करण्यास सांगितला आहे. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दोषी अधिकाऱ्यांवर लवकरात लवकर कठोर कारवाई करू असे आश्वासन दिले आहे.