वारंवार तक्रार करत अतिक्रमण धारकांवर कारवाईची मागणी,कारवाई होत नाही म्हणून तक्रारदारचा आत्मदहणाचा इशारा…..

संपादक गफ्फार मलिक(शेख)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
३१ मार्च २०२१ ला सखोल चौकशी करत कारवाईचे नगरपालिका अधिकारी यांचे अश्वासन
१७ जानेवारी २०२२ आत्मदहन मागे घ्यावे कारवाई चे पुन्हा नगरपालिका प्रशासनाचे अश्वासन पत्र
४ ऑक्टोबर २०२२ प्रस्तावित नगरपालिका प्रशासनाचे अश्वासन पत्र
१० ऑक्टोबर २०२२ ला पुन्हा नारायण जेठवणी यांचे नगरपालिका प्रशासनास तक्रार पत्र
मात्र आजपर्यंत कारवाई नाही. यामुळे जेठवणी यांचा शिवजयंती च्या दिवशी आत्मदाहणाचा निर्णय
चाळीसगांव(प्रतिनिधी)-शहरातील अतिक्रमणधारक शेखर कन्हैयालाल बजाज व हिरानंद चंदीराम बजाज व इतरांनी चाळीसगांव नगरपालिका हद्दीत विविध ठिकाणी नियमबाह्यरित्या अतिक्रमण केले आहे,याबाबत नगरपालिका प्रशासनाला या अतिक्रमण धारकांच्या विरोधात माहिती अधिकार कार्यकर्ता नारायण जेठवाणी यांनी अनेक तक्रार अर्ज देवून त्या संदर्भात अनेक वेळेस पाठ पुरावा केला आहे.अर्ज देते वेळीस उपोषणाची नोटिस देवून सुध्दा नपा प्रशासनाने गांभीर्याने दखल न घेता तात्पूरते मनधरणीच्या दृष्टीकोणातून लेखी स्वरुपात गुळगुळीत उत्तरे देवून सुध्दा आजतागयात कुठल्याच प्रकारे कठोर कार्यवाही केलेली दिसत नसून नपा प्रशासन माजी नगरेसवक शेखर कन्हैयालाल बजाज यांना पाठीशी घालत आहेत! अतिक्रमण विरोधात दिलेल्या अर्जा बाबत मुख्याधिकारी साहेबांना (प्रशासकाना) ही बाब निर्दशनास येवुन सुध्दा कार्यवाही न करण्यामागील गौडबंगाल काय ? याचा खुलासा ही कधी केला नाही. म्हणून प्रशासनाच्या या भूमिकेविरोधात दि.09 जानेवारी 2023 रोजी नाइलाजास्तव मला स्मरण पत्राद्वारे नगरपालिकेकडे आजपर्यंत केलेल्या अर्जांची स्मरण करून देण्याच्या दृष्टिकोणातून या अर्जाद्वारे भविष्यात फेब्रुवारी महिन्यात उपोषणास न बसता सरळ आत्मदहनाचा इशारा नारायण जेठवाणी यांनी जिल्हाधिकारी,सहाय्यक आयुक्त,नगरपलिका विभाग,जळगांव तसेच मुख्यधिकारी न.पा.चाळीसगांव यांना देण्यात आलेल्या अर्जात दिला आहे. बजाज बंधूनी शहरात विविध ठिकाणी केलेल्या अतिक्रमणा विरोधात गेल्या कित्येक महिन्यांनपासून पाठपुरावे केले आहेत. त्यानंतर सुध्दा माझ्यावर झालेल्या अन्यायास न्याय न दिल्यास आत्मदहन करेल. मी जेष्ठ नागरिक आहे. ब्लडप्रेशर व मधुमेह आजाराने ग्रसित आहे. माझे जीवाचे बरेवाईट झाल्यास याला सर्वास्वी संबंधित अधिकारी जबाबदार राहतील कारण माझ्या अर्जाचे लेखी उतरे देवून नुसतीच देखावात्मक कार्यवाही केली आहे व आजपर्यंत करत आहे. लेखी उतरांद्वारे उडवा उडवीचे तथ्यविहिन उत्तरे दिले गेले आहेत. कार्यवाही चालु आहेत. असे उत्तरे देवून त्या माजी नगरसेवकाचे अतिक्रमण वाचवत आहेत. राजकीय दबावाचे आपण बळी पडत आहात व मला न्याय देण्यास असमर्थ ठरत आहेत हे स्पष्ट होते आहे. हा अर्ज दिल्या नंतर मी आपणास कळवित इच्छीतो की एका महिन्याच्या आत केलेल्या चौकशी वर कार्यवाही न केल्यास फेब्रुवारी महिन्यात छत्रपति शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशी मी आत्मदहन करेल याची गांभीर्याने दखल घ्यावी,असा इशारा देखील निवेदनात दिला आहे.