अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
मुंबई | महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का बसला असून बहुमत चाचणीपूर्वी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिंदे गटाचा विजय झाला आहे.
भाजपचे व शिंदे गटाचे उमेदवार राहुल नार्वेकर हे महाराष्ट्र विधानसभेचे नवे सभापती झाले आहेत. विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मतदानाद्वारे सभापतीसाठी मतदान झालं.राहुल नार्वेकरांना 164 मतं, तर राजन साळवींना 107 मतं मिळाली. हिंतेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीनं भाजप-शिंदे गटाला मत दिलं,समाजवादी पक्ष आणि एमआयएमचे आमदार तटस्थ राहिले.
विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मतदानाद्वारे सभापतीसाठी मतदान झालं.या विजयानंतर आता सोमवार, 4 जुलै रोजी विधानसभेत एकनाथ शिंदे गटाला आपलं बहुमत सिद्ध करायचं आहे. एकनाथ शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यरी यांनी बोलावलेले विशेष अधिवेशन सुरू झाले आहे. आज पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्षपदासाठी मतदान घेण्यात आले. सुरुवातील शिरगणती करण्यात आली. यावेळी एकनाथ शिंदे यांचा पहिला क्रमांक होता त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर देवेंद्र फडणवीस बसले होते.