विद्यार्थ्याला शिक्षकाची अमानुष मारहाण कठोर शिक्षेची महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाची मागणी

3 0
Read Time3 Minute, 36 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव

दौंड(प्रतिनिधी)-विद्यार्थ्याला अमानुष मारहाण करणाऱ्या क्रुरकर्मा शिक्षकाला फाशी द्या अशी मागणी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांनी निवेदनाद्वारे राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्याकडे केली आहे .याविषयी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना राज्याध्यक्ष गौतम कांबळे म्हणाले की , राजस्थान बरन जिल्ह्यातील अत्रू शाळेतील शिक्षकाच्या अमानवी कृत्याबद्दल जलदगती न्यायालयात केस चालवून सदर शिक्षकास फाशीची शिक्षा देण्यात यावी . राजस्थान बरन जिल्ह्यातील अत्रू शाळेतील अनुसूचित जातीमधील विद्यार्थी इंद्रकुमार हा माठातील पाणी पिल्यामुळे त्यास जिव जाईपर्यंत अमानूष मारहाण करणाऱ्या व शिक्षकी पेशास तसेच माणसूकीला काळीमा फासणाऱ्या ह्या शिक्षकास जलद गती न्यायालयात केस चालवून फाशीची शिक्षा देण्यात यावी . स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातसुद्धा अनुसूचित जाती, जमातीवर अत्याचार होत आहेत ही खरंच निषेधार्थ बाब आहे .याचा महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्यावतीने जाहीर निषेध करण्यात आला आहे . ह्या शिक्षकास कठोरात कठोर शिक्षा अर्थात फाशीची शिक्षा देऊन देशासमोर एक उदाहरण सादर करण्यात यावे .यामुळे येथून पुढे कोणीही असे कृत्य करण्यास धजावणार नाही . अनुसूचित जाती-जमाती,इतर मागासवर्गातील विद्यार्थी शिक्षण प्रवाहात आता येत आहेत . यांच्यावर असे अत्याचार होऊ नयेत यासाठी विशेष कायदा करण्यात यावा अशी मागणी ही निवेदनात करण्यात आली आहे .या मागणीचे निवेदन नरेंद्र मोदी , प्रधानमंत्री भारत सरकार ,रामदासजी आठवले केंद्रीय समाजीक न्याय राज्यमंत्री भारत सरकार , महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
एकनाथजी शिंदे व राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आल्या आहेत .यावेळी राज्य महासचिव विठ्ठल सावंत , राज्य सल्लागार दिगंबर काळे , राज्य उपाध्यक्ष मिलिंद थोरात , पुणे जिल्हाध्यक्ष विनोद चव्हाण व महासचिव मिलिंद देडगे ,जिल्हा उपाध्यक्ष जयवंत पवार ,खेड तालुका अध्यक्ष दत्तात्रय शिंणगारे , मुळशी तालुकाध्यक्ष दशरथ गावडे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते .

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.