आज दिनांक-२७/०४/२०२० रोजी पुणे जिल्हा बँकेच्या आयोजित मा.कार्यकारी सभेमध्ये सामाजिक बांधिलकी व मानवतेच्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषद पुणे यांनी जाहीर केलेल्या “शरद भोजन योजना” करीता बँकेच्या नफ्यातून रक्कम रु.१ कोटी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तसेच कोरोना विषाणू संसर्ग रोगाच्या प्रादुर्भाने राज्याच्या अर्थव्यवस्थेवर आलेल्या संकटाला मदत म्हणून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सेवकांनी दोन दिवसांची रक्कम रु.३७ लाख मुख्यमंत्री सहाय्याता निधीमध्ये देण्यास निश्चित केले आहे.बँकेने रक्कम रु.१.०० कोटी “शरद भोजन योजनेस” व सेवकांचा दोन दिवसांचा पगार रक्कम रु.३७.००लाख मुख्यमंत्री सहाय्यता निधीस अशी एकूण रु.१ कोटी ३७ लाख निधी देणेबाबत बँकेचे विद्यमान संचालक मा.ना.भरणे, राज्यमंत्री तथा पालकमंत्री सोलापूर जिल्हा व बँकेचे अध्यक्ष मा.श्री.रमेश थोरात.मा.संचालक यांच्या उपस्थितीत निर्णय घेण्यात आला.यावेळी बँकेचे मा.संचालक श्री.दिलीप मोहिते(आमदार),मा. संचालक श्री.आत्माराम कालाटे,मा.संचालक निवृत्ती अण्णा गवारी व मा.मुख्य कार्यकारी अधिकारी-श्री.प्रतापसिंह चव्हाण व तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Read Time1 Minute, 59 Second