शांत व संयमी चाळीसगावकर घरपट्टी वाढ बाबत आक्रमक…

संपादक गफ्फार शेख(मलिक)
एखादी कार्यकर्ता अथवा नेता दिवंगत झाल्यानंतर जशी..सर्वपक्षीय शोकसभा बोलण्यात येते….तशीच सर्वपक्षीय माजी नगरसेवक व येणाऱ्या पूढील नगरपालिका निवडणूकीत सर्व भावी नगरसेवक व कार्यकर्त्यानी व नेत्यांनी….नगरपालिकेवर ऐतीहासीक आंदोलन व मोर्चा न्यायला हवा…अवाजवी घरपट्टी दरवाढ थेट करून चाळीसगाव शहरातील करदात्यांच्या व नागरिकांच्या खिशावर प्रशासकीय कर्मचारी दरोडा घालताय व घातला आहे….. याविरुद्ध सर्वपक्षीय व तमाम चाळीसगावकर यांनी लोकशाही व संविधानीक पध्दतीने आंदोलन सूरू करावे एवढीच अपेक्षा–
उदय पवार(चाळीसगावकर)
चाळीसगाव(अधिकार आमचा विशेष)- चाळीसगाव नगरपालिकेने केलेली घरपट्टीत दरवाढ ही शहरात चर्चेचा विषय ठरत आहे.या विषयाला जनसामान्यांपासून ते लोक प्रतिनिधींपर्यंत विरोध पाहायला मिळत असून शहरात सध्या या विषयावर चाळीसगावकर आक्रमक दिसत आहेत.
शहरात झालेली घरपट्टी दरवाढ ही कोणत्या शासन नियम व अटीच्या आधारे करण्यात आली आहे.याबाबत नगरपालिका प्रशासनाने खुलासा करणे आवश्यक आहे.तसेच ही घरपट्टी दर वाढ करतांना शहरातील नागरिकांना सुचित करण्यात आले होते की नाही? हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे.या दरवाढीला पक्ष संघटना विरोध दर्शवित आहेत तसेच लोकप्रतिनिधी देखील विरोध करत आहेत तरी झालेली दरवाढ नगरपालिका प्रशासनाने कोणत्या आधारावर केली वरिष्ठांचे आदेश होते किंवा वरिष्ठांना याबाबत कल्पना दिली होती का? की स्वतः आपल्या पदाचा वापर करून हा भार जनतेच्या डोक्यावर टाकण्याचा मनमर्जी ने प्रयत्न सुरू आहे असे तर नाही ना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका समोर ठेवून घरपट्टी दरवाढ करून नंतर ही घरपट्टी लोकहितासाठी कमी करायचे भासवून एखाद्या लोकप्रतिनिधीने आपण शहरवासीयांवर उपकार केले आहे अशी भावना तयार करायची असे तर नाही ना? पण एक गोष्ट या घरपट्टी वाढ मुळे पाहायला मिळाली ती म्हणजे शहरातील विविध समस्यांमुळे खराब रस्ते असो की नित्कृष्ठ दर्जाची सुरू असलेली विकास कामे की स्वच्छतेचा अभाव सर्व शांत व संयमाने सहन करणारे चाळीसगवकर आक्रमक होतांना दिसत असून नागरिकांपासून ते लोकप्रतिनिधी पर्यंत एका विषयावर चुकीच्या दरवाढीच्या निर्णयाचा विरोध करत आहेत हे मात्र येणाऱ्या काळात मनमानी काम करणाऱ्या ठेकेदार असो की प्रशासक यांना सावध होण्याचा इशाराच आहे.यापुढे असेच नागरिक,संघटन,पक्ष व लोकप्रतिनिधी यांनी शहरात सुरू असलेल्या नित्कृष्ठ दर्जाच्या विकास कामांबाबत देखील आक्रमक व्हावे तूर्तास एवढेच….