अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव :- मराठी पत्रकार परिषदेच्या चाळीसगाव तालुका अध्यक्षपदी दैनिक रघुनंदनचे संपादक मंगेश शर्मा तर जिल्हा कार्यकारिणीवर पुण्यनगरीचे पत्रकार मोतीलाल अहिरे यांची निवड करण्यात आली आहे.
जळगाव येथे बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष विजय पाटील ,सचिव जमनादास भाटिया यांच्या उपस्थित ही निवड करण्यात आली.शासन व जळगाव जिल्हा पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने जळगाव येथील पत्रकार भवनात आज दि.20 फेब्रुवारी रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमात जिल्ह्याची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली या कार्यकारिणीत दैनिक पुण्यनगरी मोतीलाल आहीरे यांची निवड करण्यात आली तर चाळीसगाव तालुका अध्यक्ष म्हणून स्व.रघुनंदनजी शर्मा यांचे पुतणे संपादक मंगेश शर्मा यांची निवड करण्यात आली आहे निवड झालेल्या मंगेश शर्मा व मोतीलाल अहिरे यांचे विश्वस्त मंडळाच्या वतीने पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्र देऊन स्वागत करण्यात आले तर चाळीसगाव शहर कार्यकारिणीवर गफ्फार नजीर शेख,रोहित विलास शिंदे यांची एकमताने निवड झाली आहे.