शिक्षकाला न्याय मिळणे दुरच,अधिकाऱ्याचा तोरा मात्र कायम ??-गौतम कांबळे(राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघ)

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
चाळीसगाव(प्रतिनिधी)-माध्यमिक शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे यांच्याकडून शिक्षकाला न्याय मिळेना म्हणून शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांना निवेदन व्हाट्सअपद्वारे व मेलद्वारे पाठवले .निवेदनावर त्यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही म्हणून त्यांची भेट घेतली असता शिक्षकावर काय अन्याय झालाय हे ऐकून घ्यायच्या मूडमध्ये नव्हते .त्यांचा अधिकारीपणाचा तोरा कायम होता .अशा हेकेखोरवृत्तीच्या अधिकाऱ्यांमुळे मागासवर्गीयांवर सगळीकडे अन्याय होत आहेत . ही बाब गंभीर आहे .हेकेखोर व असंवेदनशील प्रवृत्तीच्या अधिकाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय कास्ट्राईब शिक्षक महासंघ गप्प बसणार नाही अशी माहिती संघटनेचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली .
याविषयी सविस्तरपणे बोलताना गौतम कांबळे म्हणाले की ,पिंपळगाव तालुका दौंड जिल्हा पुणे येथील संस्थेत सहा शिक्षक कार्यरत आहेत .तेथील शिक्षकांची सेवा जेष्ठता यादी करण्याची मागणी दीड -दोन वर्षापासून आहे .शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे यांनी सहा शिक्षकांची सेवा जेष्ठता यादी निश्चित करण्यासाठी दोन वेळा सुनावणी घेतली परंतु त्यांना निर्णय घेता आला नाही .अर्थात मागासवर्गीय शिक्षकाला मुख्याध्यापक पदावर पदोन्नती मिळेल म्हणूनच त्या दोन वेळा सुनावणी घेऊन ही सेवा जेष्ठता यादी अंतिम करत नाहीत .शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांना शिक्षकाचे निवेदन वाचण्यासाठी वेळ नाही व म्हणणे ऐकून घेण्यासाठीही वेळ नाही परंतु त्यांची भेटीची वेळ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली होती व त्यांनी भेटण्याची तयारी दर्शवली होती तरीही त्यांनी शिक्षकाचे निवेदन वाचण्याची तसदी घेतली नाही. याच्यापाठीमागे आर्थिक हितसंबंध गुंतलेले असल्याची चर्चा शिक्षकांमध्ये आहे .याची गुप्तचर यंत्रणेमार्फत चौकशी करण्यात यावी .पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी श्रीमती सुनंदा वाखारे व शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांनी शासनाला सादर केलेल्या मता दायित्वाचा गुप्तचर यंत्रणेमार्फत तपास करावा अशी विनंती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे .यावेळी राज्य प्रवक्ते विनोद चव्हाण ,राज्य उपाध्यक्ष सत्यदेव खाडे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते .