शिक्षक बांधवांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे एक दिवसीय धरणे आंदोलन

2 0
Read Time3 Minute, 2 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव

दौंड(प्रतिनिधी)-दि १८ एप्रिल रोजी शिक्षक बांधवांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे पुणे जिल्हा परिषद येथे एक दिवसीय धरणे आंदोलन

शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर वारंवार निवेदन देत महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघातर्फे खालील विषयांवर वारंवार निवेदने देऊन , प्रश्न सुटत नसल्याने ‌
लोकशाही मार्गाने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांनी सांगितले तसेच तरी सर्व स्वाभिमानी शिक्षक बंधू भगिनींनी या धरणे आंदोलनात सहभागी व्हावे अशी विनंती ही केली आहे

खालील प्रलंबित प्रश्नांसाठी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघातर्फे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे
१)सन २०१२ पासून पुणे जिल्हा परिषदेमध्ये मुख्याध्यापक पदोन्नती झाली नाही ती विनाविलंब करण्यात यावी.
२) २००५ नंतर शासकीय सेवेत रूजू झालेल्या शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना जूनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी .
३) महानगरपालिका हद्दवाढ क्षेत्रातील ३४ गावांमधील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना पुणे महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात यावे तसेच शासकीय नियमानुसार महानगरपालिका क्षेत्रातील कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांना २७ % घरभाडे भत्ता लागू करण्यात यावा
४)कोविड १९ च्या काळात कर्तव्यावर असताना मृत्यू पावलेल्या ३४७ शिक्षकांना शासन निर्णयानुसार ५० लाखाच्या विमा योजनेचा लाभ मिळावा व कुटुंबातील एका व्यक्तीला अनुकंपातत्वावर नोकरी विनाविलंब मिळावी.
५) दोन लाखांपर्यंतची वैद्यकीय बिले जिल्हा परिषद स्तरावर तात्काळ मंजूर करण्यात यावीत.
६)२०१० पासून प्रलंबित केंद्र प्रमुख पदोन्नती अभावितपणे त्वरित करण्यात यावी

  
Happy
Happy
100 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.