शिवजयंती निमित्ताने वाल्हेकरवाडी येथे शिव चषक भव्य क्रिकेट स्पर्धा…

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी सनी घावरी
चिंचवड(प्रतिनिधी)-वाल्हेकरवाडी येथे श्री शिवछत्रपती प्रतिष्ठान व राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने क्रिकेट स्पर्धा घेण्यात आल्या तसेच सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन हे पिंपरी चिंचवड महानगरपालिका माजी विरोधी पक्षनेते मा.श्री तानाजी वाल्हेकर यांच्या हस्ते करण्यात आले आणि नंतर उपांत्यपूर्व फेरीला सुरवात केली.
या क्रिकेट स्पर्धा 32 संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेसाठी 4 पारितोषिक ठेवण्यात आले होत़े या स्पर्धेत 1st यश कलाटे क्रिकेट क्लब वाकड 2nd R.C क्रिकेट क्लब लोहगाव 3rd अक्षय चव्हाण क्रिकेट क्लब वाल्हेकरवाडी 4th तिरंगा क्रिकेट क्लब चिंचवड या संघानी पटकावले.या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभा साठी आ. आण्णा बनसोडे,संजोग वाघेरे( शहराध्यक्ष रा.काॅ),नाना काटे(विरोधी पक्षनेते), मोरेश्वर भोंडवे(नगरसेवक), भाऊसाहेब भोईर(नगरसेवक), प्रभाकर वाघेरे(मा.उपमहापैर),शेखर चिंचवडे(युवा नेते), तानाजी वाल्हेकर(मा.विरोधी पक्षनेते),संदीप (लाला) चिंचवडे(सरचिटणीस रा
काॅ युवक प्रदेश), विनोद काबंळे(शहराध्यक्ष सामाजिक कल्याण विभाग रा.काॅ),सुनिल गव्हाने(प्रदेशाध्यक्ष रा.कॉ विद्यार्थी ),नथुशेठ वाल्हेकर, तुकाराम वाल्हेकर, विजय काळभोर,अशोक भालके,राजाभाऊ चिंचवडे,संदीप भालके, सुनील वाल्हेकर, युवराज वाल्हेकर ,माऊली वाल्हेकर जितेश वाल्हेकर,बाजीराव वाल्हेकर,सुनील वाल्हेकर वसंत ढवळे,आदी मान्यवर उपस्थित होते.
ही स्पर्धा 15 फेब्रुवारी- 19 फेब्रुवारी दरम्यान घेण्यात आली होती.या स्पध्रेचे सर्व नियोजन अजिंक्य वाल्हेकर, अभिषेक वाळके,गिरीश भोंडवे, दुर्गेश सुर्वे,प्रशांत शिंदे,सुरज वाल्हेकर,बाबु नढे,अमर तायडे,महेश हाडमोडे, तुषार जाधव,तेजस चिकने(सरचिटणीस रा.काॅ शहर) शैलेश चव्हाण,सचिन यादव केले होते. ही स्पर्धा धनंजय तानाजी वाल्हेकर यांच्या पुढाकाराने घेण्यात आली होती. या स्पर्धेमधून आपल्या परिसरातील खेळाडूला चालना भेटावी हीच आपली इच्छा आसे धनंजय वाल्हेकर यांनी सांगितले.
बक्षिस वितरणनाचे सर्व सूत्रसंचालन विनोद कांबळे यांनी केले. व लाला चिंचवडे यांनी आभार मानले.