Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...
  • Thu. Feb 9th, 2023

ADHIKAR AAMCHA

Media News Portal

शेतकऱ्यांचे दूध संघाकडून ९ कोटींचे पेमेंट थकले ते चेअरमन व प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे-आमदार चव्हाण

Byadmin

Nov 24, 2022
1 0
Read Time3 Minute, 33 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

उपसंपादक रोहित शिंदे

जळगांव(वृत्तसेवा)-दि.२३ – जळगाव जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ मर्या. जळगाव ची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच सदर दुध संघात झालेल्या अखाद्य तूप अपहार प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून त्यात संघाचे कार्यकारी संचालक, प्रशासन अधिकारी व इतर अधिकारी – कर्मचारी यांना अटक झाली आहे. अश्या परिस्थिती दुध संघातील प्रशासनाने संघाच्या दैनंदिन कामकाजावर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून योग्य ती कार्यवाही करणे क्रमप्राप्त होते. तसेच कार्यकारी संचालक पदाचा कार्यभार संघातील इतर तत्सम अधिकाऱ्याकडे देणे आवश्यक होते. आचार संहिता असताना सर्व निर्णय घेण्याचे अधिकार हे चेअरमन यांच्याकडे असतात तरी सुद्धा त्यांनी याची दखल घेतलेली दिसत नाही. दुध संघाचे चेअरमन व प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे सद्यस्थितीत शेतकऱ्यांचे दुधाचे ९ कोटींचे पेमेंट थकले आहे तसेच इतर दूध संकलन व वितरण करणारी वाहने यांचे पेमेंट थकीत झाले आहे, तरी संघाच्या चेअरमन व प्रशासनातील अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे दुध संघातील दैनंदिन कामकाज, दुध उत्पादक शेतकरी व संस्था यांना येणाऱ्या वरील अडचणींची आपण तत्काळ दखल घेत दैनंदिन कामकाज सुरुळीत होण्याकरिता संबंधितांना निर्देश द्यावेत असे पत्रच चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी सहाय्यक उपनिबंधक सहकारी संस्था (दुग्ध) जळगाव यांना दिले आहे.

पत्रात त्यांनी नमूद केले आहे की, दुध उत्पादकांचे पेमेंट दर महिन्याच्या १,११,२१ तारीख अश्या दशकाच्या बिलींग सायकल मधे होत असते. तसेच दुध संकलन व दुध वितरण च्या ट्रान्स्पोर्ट पेमेंट महिन्याला ८,१८,२८ तारखेला ला होणे अपेक्षित आहेत. तसेच दुध संकलन करणारी व वितरण करणारी वाहने यांचे पेमेंट थकीत असल्यामुळे वाहतुक ठेकेदार हवालदिल झाले आहेत. तसेच दैनंदिन देयकांवर सह्यांचे अधीकार कुणालाही दिले नसल्यामुळे संघाला सर्व प्रकारचे साहित्य पुरवणारे ठेकेदार यांचे पेमेंट होत नसल्यामुळे त्याचादेखील दैनंदिन कामकाजावर विपरित परीणाम होत आहे. याबाबत माझ्याकडे दुध उत्पादक शेतकरी, संस्था यांनी तक्रारी केल्या असल्याचे देखील त्यांनी नमूद केले आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

You missed

error: Content is protected !!