Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

श्री मयूर भुजबळ परि पोलीस उपअधीक्षक यांची दौंड पोलीस स्टेशन हद्दीत चोरून वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर कारवाई चे सत्र चालूच, वाळू माफियांचे धाबे दणाणले तब्बल 31 लाख रुपयांचा मुद्देमाल केला नष्ट.

0
2 0
Read Time2 Minute, 38 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव

दौंड(प्रतिनिधी)-दिनांक 01.4.2021 रोजी दौंड पोलीस स्टेशन येथे पोलीस उपअधीक्षक श्री मयुर भुजबळ हजर असताना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की मौजे आलेगाव गावचे हद्दीतील भीमा नदीच्या पात्रात तालुका दौंड जिल्हा पुणे येथे इसम नामे अजय शिंदे राहणार दौंड जिल्हा पुणे हा व दोन इसम नाव पत्ता माहीत नाही हे अवैधरित्या यांत्रिक बोटीच्या साह्याने विनापरवाना वाळू उपसा करून वाळू चोरी करीत आहे अशी खात्रीशीर बातमी श्री मयुर भुजबळ यांना मिळाल्यानंतर सदर ठिकाणी कारवाई करण्याकामी दौंड तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या मदतीने मौजे आलेगाव गावच्या हद्दीत भीमा नदीच्या पात्रात तालुका दौंड जिल्हा पुणे येथे छापा घातला असता सदर ठिकाणी 31 लाख रुपये किमतीच्या वाळूउपसा करण्याकरिता वापरल्या जाणाऱ्या यांत्रिक फायबर बोटी मिळून आल्या त्या जागीच भीमा नदीत बुडवून नष्ट करून टाकल्या असून सदर इसमान विरुद्ध भा.दं.वि.कलम ३७९,४३९,३४ सह गौणखनिज अधिनियम कलम ४,२१, पर्यावरण सरंक्षण अधिनियम १९८६ चे कलम ९,१५ वसार्वजनीक मालमत्ता विद्रुपीकरण कलम ४ , प्रमाणे कायदेशिर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास हे पोलीस हवालदार विनोद चव्हाण दौंड पोलीस स्टेशन हे करीत आहेत. सदरची कारवाई ही

माननीय पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख , अप्पर पोलीस अधीक्षक बारामती मिलिंद मोहिते , उपविभागीय पोलिस अधिकारी दौंड राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली परि पोलीस उप अधीक्षक मयूर भुजबळ, पोलीस उपनिरीक्षक भगवान पालवे पोलीस अंमलदार विशाल जावळे, किरण डुके, यांनी केली आहे

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: