
पुणे(प्रतिनिधी):NRC व CAB हे कायदे संविधान विरोधी असून पूर्णतः घटनाबाह्य आहेत. पाशवी बहुमताच्या जोरावर असे कायदे पारित करून जनतेच्या माथी मारणे म्हणजे हुकूमशाहीकडे देश घेऊन जाणे असे आहे. त्यामुळे अशा संविधान विरोधी कायद्यांना अहिंसेच्या मार्गाने विरोध करून सरकारला हे बिल मागे घेण्यासाठी सरकारला मजबूर करण्यासाठी यापुढे देश पातळीवर लढा उभा केला जाईल. अशी अब्दुररहमान यांनी व्यक्त केली.
भीम आर्मी बहुजन ,एकता मिशन तसेच मूलनिवासी मुस्लिम मंचाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
केंद्र सरकारने NRC व CAB बाबत पारित केलेल्या कायद्याच्या विरोधात अब्दुररहमान यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन निषेध व्यक्त केला आहे. या अनुषंगाने त्यांच्या या स्वाभिमानी निर्णयाचा फुले पगडी व भारतीय संविधान देऊन या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला.
CAB किंवा NRC चा धोका हा केवळ मुस्लिम समाजाला नाही तर या देशातील विविध धर्मांना सुद्धा आहे त्यामुळे 125 कोटी जनतेने पोटाचा किंवा रोजगाराचा प्रश्न मिटवायचा का राष्ट्रीयत्व सिद्ध करायचं हा प्रश्न निर्माण झाला आहे.
त्यामुळे देशपातळीवर लोकांमध्ये जागृती करण्याची भूमिका घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष दत्ता पोळ होते ते तर अंजुम इनामदार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन रमेश राक्षे यांनी केले तर आभार प्रकट सो नीता अडसूल यांनी केले.या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात फुले शाहू आंबेडकरी संघटनात काम करणारे
ऍड मोहन वाडेकर,शयाम गायकवाड, मुकुंद काकडे,डॉक्टर म्यानुल डिसोझा,राजेश खडके,प्रकाश जगताप,एन.टी.घोरपडे,सुशीला सोनवणे, फातिमा शेख, नीलम गायकवाड,महिला कार्यकर्ते सहित प्रदिप कांबळे, भीमराव कांबळे, अभिजित गायकवाड, राहूल बनसोडे,
इत्यादी मान्यवर उपस्थित होते