सकल मराठा समाजाचे मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण,उपोषणास रयत सेनेचा पाठिंबा

संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी) – सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणासाठी तळेगाव येथे गुणवंत शेलार यांचे साखळी उपोषण तर शिरसगाव येथे दिलीप पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका महिन्यात महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र एक महिना होऊन ही दिलेला शब्द मुख्यमंत्र्यानी पूर्ण केला नाही म्हणून पुन्हा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले तर मराठा समाजाला साखळी उपोषण सुरू करण्याचे आवाहन केले होते. त्या अनुषंगाने चाळीसगाव सकल मराठा समाजाच्या वतीने तळेगाव व शिरसगाव येथे साखळी उपोषण व आमरण उपोषण स्थळी जाऊन मराठा आरक्षणाच्या मागणीला रयत सेनेचा पाठिंबा दर्शवला याप्रसंगी रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार , भ्रष्टाचार निर्मूलन सेनेचे प्रदेशाध्यक्ष खुशाल पाटील, सांस्कृतिक सेनेचे अध्यक्ष सचिन पवार, प्रदेश संघटक ज्ञानेश्वर कोल्हे, प्रदेश समन्वयक पी एन पाटील, उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष आबासाहेब गरुड,जिल्हा कार्याध्यक्ष नाना शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोल्हे, शेतकरी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष किरण पवार, तालुका उपाध्यक्ष मुकुंद पवार, दत्तु पवार ,शहराध्यक्ष छोटू अहिरे,शहर संघटक दीपक देशमुख व राजेंद्र पाटील ,परमेश्वर गोल्हार नानासाहेब पाटील, संदीप पाटील,भगवान पवार,शिरीष पवार,गणेश देशमुख,कळमडु चे संजीव पाटील यांच्यासह रयत सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते