सजग नागरीक संघाची गांधीगिरी ; मुख्याधिकारी नसल्याने नागरीकांची होतेय गैरसोय

Read Time2 Minute, 19 Second

चाळीसगाव – नगरपरिषदेत गेल्या ५ ते ६ महिन्यापासून मुख्याधिकारी नसून दिवसेंदिवस समस्या वाढत आहेत यात आरोग्य,स्वच्छता,मूलभूत गरजा याचा प्रश्न भेडसावत आहे.पालिकेत मुख्याधिकारी नसल्याने प्रशासकीय कामांचे नियोजन कोलमडले असून नियंत्रण राहिलेले दिसून येत नाही.सजग नागरीक संघाच्या वतीने यापूर्वी समस्यांचे निवेदन दिलेले होते यातील काही समस्या मार्गी लागल्यात तर काही समस्या जैसे थे त्याच स्थितीत आहे.

सजग नागरीक संघाच्या वतीने गांधीगिरीच्या मार्गाने नगरपरिषद कार्यालयात जाऊन अनोखे आंदोलन करण्यात आले यात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्या खुर्चीला प्रतिकात्मक हार घालण्यात आला.नागरीकांना आज अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून अनेक प्रशासकीय योजना खोंळबल्या आहेत.यासाठी खासदार उन्मेष पाटील,आमदार मंगेश चव्हाण,नगराध्यक्षा आशालता चव्हाण,उपाध्यक्षा आशाताई चव्हाण,गटनेते संजय पाटील,विरोधी गटनेते तथा माजी आमदार राजीव देशमुख यांनी तातडीने जिल्हाधिका-यांकडे पाठपुरावा करुन चाळीसगाव नगरपरिषदेस मुख्याधिकारी मिळवून द्यावेत अशी मागणी यावेळी सजग नागरीक संघाच्या वतीने करण्यात आली.

यावेळी गणेश पवार,दिलीप घोरपडे,उदय पवार,मुराद पटेल,तमाल देशमुख,एकनाथ सोमवंशी,कुणाल कुमावत,खुशाल पाटील,सागर नागणे, दिपक पाटील,दिलीप सोनार,हरेश जैन,गणेश पाटील,अक्षय देशमुख,श्रीकांत भामरे,स्वप्नील कोतकर आदी उपस्थित होते.

0 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *