संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)-दि.26 जुन 2023 रोजी चाळीसगांव येथे समता सैनिक दलाच्या ( SSD) केंद्रीय कार्यालयात लोक कल्याणकारी राजा , आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी दलाचे मुख्य प्रचारक मा.धर्मभुषण बागुल साहेब यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.यावेळी धर्मभूषण बागुल यांनी उपस्थित कार्यकर्त्याना राजर्षी शाहु महाराज यांच्या कार्याची सविस्तर माहिती दिली.
महाराजांनी शिक्षणासाठी केलेले कायदे, शोषित पीडित वर्गाला स्वतःचा विकास करून घेण्यासाठी आरक्षणाची तरतुद, भारतातील पाचवे धर्मपीठ, शेतकरी सुजलाम सुफलाम व्हावा म्हणुन मोठ मोठ्या धरणांची तरतुद, कृषी धोरण , शाळा व वसतिगृहे निर्मिती , जातीयता नष्ट व्हावी म्हणून केलेले प्रयत्न अशा विविध कार्याची माहिती यावेळी देण्यात आली.
तसेच राजर्षी शाहु महाराज व राष्ट्रनायक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या दोघांमध्ये झालेली ऐतिहासिक भेट ही एक महान घटना असून त्यावर प्रकाश टाकण्यात आला.
त्या काळात एवढी मोठी जातीयता असताना, समाजात प्रचंड विषमता असताना, त्याकाळी भारतील एका राजाला जेव्हा कळाले की, एका महार समाजाचा विद्यार्थी अमेरिकेहून एम ए पी. एच. डी. पदवी घेऊन आला आहे , तर राजांनी त्यांची माणसं पाठवुन भिमराव आंबेडकर नावाचा विद्यार्थी कोण आहे असा तपास लावण्यास सांगितले. नंतर राजे स्वतःहा मुंबई मधील परळच्या चाळीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भेटण्यासाठी गेले होते. महाराजांनी भेटी दरम्यान अशा भावना व्यक्त केली की , ” आता आम्ही मुक्त झालो, आता आम्हाला मागासवर्गीयांचा , शोषितांचा , वंचितांचा पुढारी मिळाला. !”
राजर्षी शाहू महाराजांची जयंती दिवाळी सारखी उत्साहात साजरी करा असा संदेश महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयायांना दिला होता.
त्यानुसार यापुढे महाराजांची पुढील जयंती सणा सारखी साजरी केली जावी आणि त्यासाठी दलाच्या कार्यकर्त्यांनी लोकांमध्ये जावून प्रचार करावा असे आवाहन धर्मभुषण बागुल यांनी केले.उपस्थित कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाचे जोरदार टाळ्या वाजवून स्वागत केले. कार्यक्रमास जिल्हा प्रचारक स्वप्निल जाधव, पितांबर झाल्टे , भाईदास गोलाईत , तालुका प्रचारक नितीन मरसाळे, बाबा पगारे, दिपक बागुल, ज्ञानेश्र्वर बागुल, निवृत्ती बागुल , सचिन गांगुर्डे जेष्ठ सैनिक महेंद्र भाऊ जाधव वसंतराव मरसाळे ,चिंतामण निकम , प्रदीप अहिरे ,हेमराज अहिरे , मुन्ना पाटील यांचेसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.