अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार मलिक
चाळीसगाव — येथे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अखंड वर्षाच्या परंपरेनुसार रघुवीर व्यायाम शाळेच्या वतीने भव्य कुस्तीचा सामना आयोजित करण्यात आला आहे. श्री रघुवीर व्यायाम शाळा व कै. कोंडाजी वस्ताद व्यायाम शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबादाप्रमाणे यंदाही 2 एप्रिल शनिवारी गुढीपाडव्याच्या दिवशी भव्य कुस्तीचा सामना घाट रोड वरील अँग्लो उर्दू हायस्कूलच्या भव्य प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे. कुस्तीचा आखाडा पूजन माजी मंत्री गिरीशभाऊ महाजन व चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या व्यवस्थापन समितीचे चेअरमन नारायणदास अग्रवाल यांच्या हस्ते होणार आहे. कुस्ती उद्घाटन जळगाव लोकसभा खासदार उमेशदादा पाटील, चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष व माजी आमदार राजीवदादा देशमुख हे भूषविणार आहेत. कुस्ती सामने दुपारी ३ ते ७ या वेळेत घेण्यात येणार आहे. कुस्तीसाठी आमंत्रीत मल्लासह विविध जिल्ह्यातील नामवंत मल्ल हजेरी लावणार आहेत तरी कुस्तीप्रेमींनी व नागरिकांनी सामन्यांचा लाभ घ्यावा असे आवाहन व्यायामशाळेचे अध्यक्ष अक्षय अग्रवाल उपाध्यक्ष शेख गफुर शेख हजरतनूर सचिव रमेश जानराव यांच्यासह योगेश अग्रवाल व अन्य पदाधिकारी यांनी केले आहे.