अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
उपसंपादक रोहित शिंदे
जळगाव(वृत्तसेवा)-कोरोनाच्या ओमिक्रॉन विषाणूमुळे महापालिका आणि आरोग्य विभाग खडबडून जागे झाले आहेत.जिल्ह्यात सुरुवातीला लसीकरण वेगाने झाले. मात्र, अनेकांनी इंजक्शनची भीती वाटते म्हणून लस घ्यायला टाळाटाळ केली.असेच प्रकार राज्यभरही झाले आहेत. हे पाहता लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी आरोग्य विभागाने नवीन पायलट प्रोजेक्ट हाती घेतला आहे. त्यामुळे नाशिक आणि जळगाव जिल्ह्यात नीडल फ्री लसीकरण केले जाणार आहे.
जिल्ह्यात सध्या कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पूटनिक या तीन लसी देण्यात येत आहेत. आता नीडल फ्री म्हणून ‘झायकोव-डी’ लसीचे तीन डोस दिले जाणार आहेत. एका मशीनच्या मदतीने ही लस दिली जाते. त्वचेवर मशीन ठेवली जाईल. त्यानंतर टोचणी न करता लसीचे घटक शरीरात सोडले जातील. या लसीची परिणामकारकता 66.60 टक्के आहे. या लसीच्या तीन मात्रा दिल्या जाणार आहेत. त्या त्वचेच्या वरच्या थरात दिल्या जातील. पहिली मात्रा झाल्यानंतर 28 दिवसांनी दुसरी आणि 56 दिवसांनी तिसरी मात्रा दिली जाणार आहे. केंद्र सरकारने पायलट प्रोजेक्ट म्हणून निवड केल्यांतर नाशिक आणि जळगाव जिल्ह्याला प्रत्येक 8 लाख डोस दिले आहेत.नाशिक व जळगांव जिल्ह्यात कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली असल्याचे कळते,नीडल फ्री लसीकरणा स कधी सुरवात होते याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे, लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करण्याचा केंद्र व राज्य सरकारचा विचार असून आरोग्य विभागाने कंबर कसली आह,लोकांनी सहकार्य करत लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करावे या हेतून आरोग्य प्रशासन प्रयत्न करीत आहे.