संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)-दि 9 शहर पोलीस स्टेशन हद्दीत रात्रगस्त पेट्रोलिंग करण्याची मोहीम राबविण्यात आली होती यावेळी एका पिकअप वाहनाला शंका आल्याने थांबविले असता चालक न थांबल्याने पाठलाग करून गाडी अडवत आरोपीला घेतले ताब्यात विचार पूस केली असता वाहन चोरीचे असल्याचे निष्पन्न झाले.
दिनांक 06 ऑक्टोबर 2023 रोजीचे रात्री 11 ते दिनांक. 07 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 5 वाजे दरम्यान श्री एम राजकुमार सो, पोलीस अधिक्षक जळगांव यांच्या आदेशाने व श्री रमेश चोपडे,अप्पर पोलीस अधिक्षक चाळीसगांव तसेच श्री अभयसिंग देशमुख, सहायक पोलीस अधिक्षक सो, चाळीसगांव भाग चाळीसगांव यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव शहरात पोलीस स्टेशन हद्दीत रात्रगस्त पेट्रोलिंग करण्याची मोहीम राबविण्यात आली होती. वरीष्ठाच्या आदेशाने पोलीस स्टेशन हद्दीत रात्रगस्त पेट्रोलिंग करीत असतांना रात्री 1 वाजे चे सुमारास मालेगाव रोड लगत असलेला एल.पी.जी. पंपासमोर मालेगाव कडुन चाळीसगाव शहराकडे एक बोलेरो पिकअप वाहन भरधाव वेगाने येतांना दिसली. त्यावेळी गस्तीवर असलेले पोना अमृत पाटील, पोकॉ विजय पाटील यांनी सदर वाहन चालकास पिकअप थांबविण्याचा इशारा केला असता त्याने पिकअप वाहन न थांबविता भरधाव वेगाने पिकअप वाहन हे चाळीसगाव शहराकडे चालवित नेले. तेव्हा पोलीस अंमलदार यांना सदर वाहनावर अधिक संशय बळावल्याने त्यांनी सदर वाहनाचा पाठलाग करून सदर वाहनास हॉटेल आशिष गार्डन समोर रात्री 1 वा 10 मिनीटांच्या सुमारास थांबविले. तेव्हा वाहन चालकास तु वाहन एवढ्या भरधाव वेगाने का चालवित आहात असे विचारपुस करता त्याने उडवा उडवीचे उत्तरे दिली, त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव शेख फरान शेख आरीफ वय 22 वर्ष रा. अक्सा कॉलनी, हाजरा मस्जिद जवळ मालेगाव ता. मालेगाव जि. नाशिक, असे सांगितले, त्यास त्याच्या ताब्यातील पिकअप वाहनाचे मालकी हक्काबाबत व कागदपत्रांबाबत विचारपुस करता त्याने कोणतेही समाधान कारक उत्तर न दिल्याने उडवा उडवीचे उत्तरे दिली व पिकअप वाहनाचे मालकी हक्काबाबत कोणताही दस्तऐवज अगर पुरावा सादर करु शकला नाही. तेव्हा पोलीस पथकाचा अधिक संशय बळावल्याने व सदरचे पिकअप वाहन हे चोरीचे असल्याबाबत खात्री झाल्याने सदर इसमादिरुध्द पोकॉ विजय पाटील यांचे फिर्यादीवरुन गुरनं. 475 / 2023 महा. पोलीस अधिनियम कलम 124 प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीताचे ताब्यात मिळालेले वाहन जप्त करण्यात आले.
सदर गुन्ह्याचा सखोल तपास पोहेकॉ राहुल सोनवणे व पोकॉ ज्ञानेश्वर पाटोळे यांनी केला असुन गुन्ह्याचे तपासात आरोपीताच्या ताब्यात मिळुन आलेले 5 लाख रु. किंमतीची महिन्द्रा कंपनीची बोलेरो पिकअप वाहन हे छावणी पो.स्टे. मालेगाव जि. नाशिक ग्रामीण कडील गुरनं. 282 / 2023 भा.द.वि. कलम 379 प्रमाणे दाखल गुन्ह्यातील चोरीस गेलेले असल्याचे गुन्ह्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सदरची कारवाई ही पोलीस निरीक्षक श्री. संदिप पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकॉ राहुल सोनवणे, पोना अमृत पाटील, पोना महेंद्र पाटील, पोना भुषण पाटील, पोकों विजय पाटील, पोकों आशुतोष सोनवणे, पोकॉ रविंद्र बच्छे, पोकॉ पवन पाटील,पोकॉ ज्ञानेश्वर गिते, पोकॉ ज्ञानेश्वर पाटोळे, पोकॉ समाधान पाटील, पोकॉ राकेश महाजन यांचे पथकाने केली आहे.