अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार मलिक
उत्पन्नाच्या दाखल्यासाठी शासकीय फी 33 रु 70 पैसे असून दलालांकडून 300 ते 600 रुपयांची वसुली केली जात आहे, साधारणतः 14 हजार 195 उत्पन्नाचे दाखले काढावे लागणार आहे यामुळे आता आमदार कार्यालयात शासकीय फी वगळता एक रुपये सुद्धा जेष्ठ नागरिकांचे जाणार नाही-आमदार मंगेश चव्हाण
चाळीसगांव(प्रतिनिधी)-संजय गांधी निराधार योजनेसाठी 21 हजार रुपये वार्षिक उत्पन्न असल्याचा दाखल आवश्यक असतो तालुक्यातुन रोज शेकडो नागरिक तहसील आवारात येत असून सेतू सुविधा कक्षांवर रेट बोर्ड नसल्याने नागरिकांची होते लूट, शासकीय फी अतिरिक्त अव्वा च्या सव्वा पैसे दलालांकडून घेतले जात असल्याची तक्रार आमदार मंगेश चव्हाण यांना प्राप्त झाल्या होत्या यामुळे दि 6 जुलै रोजी दुपारी तहसील कार्यालयाच्या आवारात आमदार चव्हाण यांनी समक्ष जात जेष्ठ नागरिकांना विचारले असता मोठ्या प्रमाणात लूट होत असल्याचे जेष्ठ नागरिकांनी सांगितले यावेळी दलालांची झाडाझडती घेत तहसीलदार अमोल मोरे यांची भेट घेत सर्व हकीकत मांडली.
जेष्ठ नागरिकांची संजय गांधी निराधार योजनेत मिळणारी मासिक मदत चालू वर्षात उत्पन्नाचा दाखला न जोडल्याने बंद करण्यात आली आहे या साठी सकाळी 7 वाजे पासून तहसील कार्यालया जवळ असलेल्या सेतू सुविधा कक्षांवर लोकांची गर्दी असते दिवस भर उन्हात विना जेवण जेष्ठ नागरिक ताटकळत उभे असतात काम लवकर व्हावे या हेतूने नाईलाजाने दलालांना भेटून अव्वा च्या सव्वा रक्कम द्यावी लागते या मुळे जेष्ठ नागरिकांची लूट सुरू असल्याची तक्रार आमदार मंगेश चव्हाण यांना मिळाली होती आमदार चव्हाण यांनी तात्काळ तहसील कार्यालयात जाऊन शहानिशा केली असता खरोखर दलालांकडुन लुट होत असल्याचे लक्षात आल्याने आमदार चव्हाण यांनी दलालांचे झाडाझडती घेत तहसीलदारांना भेटून सर्वी हकीकत सांगितली आणि यावेळी बोलतांना सांगितले की आता जेष्ठ नागरिकांना वणवण करण्याची गरज नाही आमदार कार्यालयात येऊन अर्ज मिळण्यापासून ते भरून जमा करण्यापर्यंत सर्वी जबाबदारी आमची असून शासकीय फी अतिरिक्त एक रुपायासुद्धा जास्त लागणार नाही.