Read Time1 Minute, 21 Second
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
सनी घावरी प्रतिनिधी

चिंचवड वाल्हेकरवाडी मध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरा मध्ये आषाढी एकादशी निमित्त कोविड 19 चा प्रादुर्भाव लक्ष्यात घेता आषाढी एकादशी ही साधे पणाने साजरी करण्यात आली.
दरवर्षी वाल्हेकरवाडी येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरा मध्ये आषाढी एकादशी ही मोठ्या उत्साहा मध्ये साजरी केली
जाते. दरवर्षी दोन ते अडीच हजार भाविक या ठिकाणी दर्शना साठी गर्दी करतात या सर्व भाविकांना मंडळाच्या वतीने फराळ वाटप करण्यात येत असते. पंरतु यावर्षी मंडळाच्या फक्त सहा कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन मंदिरा मध्ये मनोभावे विठ्ठल रुक्मिणी च्या मुर्ती ची पुजा,आरस,आराधना,अभिषेक आणी मंदिराची सजावट करण्यात आली हे मंडळाचे कार्यकर्ते
बंटी वाल्हेकर, सुरज वाल्हेकर ,तेजस चिकने, बाबु नढे,आकाश खैरे ,शुभम देठे यांंनी केले.
