अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगांव(प्रतिनिधी)-दि 26 डिसेंबर रविवार रोजी भा ज पा शहर चिटणीस सौ शितल ताई विजय जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्र तपासणी शिबीर व अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते
वाढदिवसाची सुरवात सकाळी डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून नेत्रतपासनी शिबिराची सुरवात करण्यात आली यावेळी अंदाजे 400 च्या रुग्णांनी या संधीचा लाभ घेतला यावेळी भा ज पा पदाधिकारी,नगरसेवक, कार्यकर्ते व शहरातील मान्यवर उपस्थित होते, रूग्णांची मोफत नेत्रतपासनी केल्यानंतर गरज असलेल्या रुग्णांना चष्मे वाटप करण्यात आले व ज्यांना आय ड्रॉप ची गरज होती त्यांना आय ड्रॉप वाटप करण्यात आले ज्या रुग्णांना शस्त्रक्रिया ची आवश्यकता आहे अश्या रुग्णांची लवकरच मोफत शस्त्रक्रिया केली जाणार असल्याचे ही सौ शितल ताई जाधव यांनी सांगितले
संध्याकाळी अभिष्टचिंतन सोहळ्यास आमदार मंगेश चव्हाण उपस्थित होते यावेळी आमदार चव्हाण यांनी बोलतांना सांगितले की सौ शितल ताई जाधव व त्यांचे पती विजय जाधव यांच्या कार्यास मी जवळून पाहिले असून नेहमी लोकांच्या सुखदुःखात सहभागी होत सामाजिक कार्यात यांचा पुढाकार असतो आज अभिष्टचिंतनास उपस्थित असलेली गर्दी म्हणजेच यांच्या सामाजिक कार्याची पावती आहे, सत्ते साठी कोलाट उड्या मारणारे व पुढाकार घेणारे अनेक आहेत मात्र जाधव परिवार सत्ते साठी नाही तर समाज सेवेसाठी पुढे आहे असे बोलत जणू येणाऱ्या नगरपालिका निवडणूक साठी सौ शितल ताई जाधव यांना हिरवा कंदील दिल्याची चर्चा रंगली होती या अभिष्टचिंतन सोहळ्यास शहरातील मान्यवर,नगरसेवक,समाजसेवक व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.