अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे उपचारास्तव शासनाने अधिग्रहीत केलेल्या दौंड शहरातील महालक्ष्मी हॉस्पिटल व पिरामिड हॉस्पिटलचे संबंधित डॉक्टर शासनाचे आदेश धुडकावून तसेच आपण त्यांना बसले नोटीस ढाके बसून पॉझिटिव पेशंट ऍडमिट करून घेत नसल्याचे निषेधार्थ स्थगित केलेले धरणे आंदोलन लोकशाहीचे सनदशीर मार्गाने दि 03/08/2005 रोजी सकाळी 11:00 वाजल्यापासून दौंड तहसील कार्यालयाच्या समोर करीत असले बाबत निवेदन देण्यात आले 1)उपविभागीय अधिकारी दौंड /पुरंदर/ फौज/कोरोना कावि/52,53,54/2020 दिं.21/07/2020 रोजीचा आदेश.
2) आपले कडील फौजदारी कावी/1364/2020 दिं.27/07/2020 रोजीचे संबंधित डॉक्टर्सला बजावली नोटीस.
3)ओ.पी.डी. क्र72961 या पेशंटच्या नातेवाईकांनी आपल्याकडे रीतसर केला अर्ज
शासनाने अत्यावस्थ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे वरचा उपचारास्तव दौंड शहरातील अधिग्रहण केलेल्या हॉस्पिटल्स पैकी महालक्ष्मी हॉस्पिटल आणि पिरॅमिड हॉस्पिटल ही कोरोना पेशंटला ऍडमिट करून घेत नसलेचे निषेधार्थ आम्ही आपल्या कार्यालयासमोर दिनांक 28/ 07/ 2020 रोजीचे बेमुदत धरणे आंदोलन आपले लेखी आश्वासनानंतर तसेच आपण संबंधित हॉस्पिटल्सना तात्काळ नोटिसबजावुन संदर्भीय शासकीय आदेशान्वये कोरोना पेशंटस ऍडमिट करून घेण्यासंबधीचे लेखी पत्र दिल्याने तूर्त स्थगित केले होते. परंतु सदरहू आपले आदेशानंतरही महालक्ष्मी हॉस्पिटल पिरॅमिड हॉस्पिटल यांनी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना ऍडमिट करून घेण्यास नकार दिला आहे तर दुसरीकडे योगेश्वरी हॉस्पिटल व पिरॅमिड हॉस्पिटल हे अत्यावश्यक कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांना अनामत रक्कम दैनंदिन औषधे व पी.पी.ई.किटसचे पैशाची मागणी करीत आहेत. वास्तविक पाहता उपरोल्लेखित हॉस्पिटल्स ही एम.जे.पी.ए.वाय या योजनेचे लाभार्थी असताना हे हॉस्पिटल संबंधित रुग्णांना पैशाची मागणी करत आहेत ही बाब म्हणजे शुद्ध भ्रष्टाचार आहे सबब या हॉस्पिटलचे प्रमुखावर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम 1897 अन्वये तसेच या हॉस्पिटलचे अधिग्रहण करणे संबंधि शासनाचे आदेश झाल्यानंतर उपचारा अभावी यांचे मृत्यू दरम्यानचे कालावधीमध्ये झालेले आहेत. त्यास जबाबदार धरण्यात येऊन भा.द.वि.कलम 304 अन्वये सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी लोकशाहीच्या सनदशीर मार्गाने दिनांक 03/08/ 2019 रोजी सकाळी 11:00 वाजल्यापासून स्थगित केलेले बेमुदत आंदोलन चालू केले आहे. धरणे आंदोलनात आबा(सुरेश) वाघमारे,(प्रांत उपाध्यक्ष बहुजन लोक अभियान) लोकश्री.विनायक माने(अखिल भारतीय होलार समाज संघटना प्रदेश उपाध्यक्ष),श्री.प्रशांत धनवे श्री. नरेश डाळींबे(मा.सरपंच) यानी सहभाग घेतला आहे. तसेच विकास शेलार, विनायक मोरे, रविंद्र सकट, सुशांत वाघमारे उपस्थित होते.आंदोलना दरम्यान जर का? शांतता सुव्यवस्था व सोशल डिस्टंगशींगचा प्रश्न झाल्यास त्यास सर्व तोपरी शासन जबाबदार राहील असे आंदोलन करत्यांनी म्हटले आहे.